Asia Cup 2023: बांगलादेशचा विजय अन् पाँइंट्सटेबल कन्फर्म! भारत अव्वल, तर पाकिस्तान तळाला

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरची फेरी संपली असून गुणतालिकेतील संघाचे स्थानही आता निश्चित झाले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Asia Cup 2023 Super Four Final Points Table:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोरचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी पार पडला. या सामन्यात बांगलादेशने भारताविरुद्ध 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. दरम्यान, हा सामना सुपर फोर फेरीतील अखेरचा असल्याने गुणतालिकेतील संघाचे स्थानही आता निश्चित झाले आहे.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सहा संघ सहभागी झाले होते. यातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे चार संघ साखळी फेरीतून सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरले होते.

त्यानंतर या चारही संघात एकमेकांविरुद्ध सामने खेळवण्यात आले. हे सर्व सामने झाल्यानंतर आता गुणतालिकेत भारत आणि श्रीलंका या संघांनी सुपर फोरमधील प्रत्येकी 3 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण मिळवले आहेत.

Team India
IND vs BAN: शुभमन गिलचं शतक व्यर्थ! भारताचा पराभव करत बांगलादेशने केला शेवट गोड

मात्र, भारताचा नेट रनरेट अधिक असल्याने भारताने अव्वल क्रमांक पटकावला, तर श्रीलंकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.

भारताने सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघाविरुद्ध विजय मिळवला, तर बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करला. तसेच श्रीलंकेने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला, तर भारताविरुद्ध पराभव पत्करला.

याशिवाय पाकिस्तान आणि बांगलादेशला सुपर फोरमधील प्रत्येकी 3 सामन्यांपैकी एकच सामना जिंकता आला. त्यामुळे या दोन्ही संघांना केवळ 2 गुणच मिळवता आले.

मात्र, बांगलादेशचा नेट रनरेट पाकिस्तानमध्ये चांगला असल्याने त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर पाकिस्तान मात्र चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.

Team India
Asia Cup 2023: चायनामन मोडणार इरफान पठाणचा रेकॉर्ड, पुढच्या दोन सामन्यात घ्याव्या लागणार एवढ्या विकेट्स

बांगलादेशने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव स्विकारला असून भारताविरुद्ध विजय मिळवला, तर पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव स्विकारला, तर बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला.

अंतिम सामना

आशिया चषकातील अंतिम सामना आता रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याला रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, भारतीय संघ आता 8 व्यांदा आशिया चषक जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर श्रीलंका गतविजेते असल्याने हे विजेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com