Muttiah Muralitharan: 'तो इतरांपेक्षा स्पेशल!', दिग्गज मुरलीधरनने भारताच्या युवा स्पिनरवर उधळली स्तुतीसुमने

Ravi Bishnoi: दिग्गज मुथय्या मुरलीधरनने भारतीय फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
Axar Patel - Ravi Bishnoi | Muttiah Muralitharan
Axar Patel - Ravi Bishnoi | Muttiah MuralitharanICC
Published on
Updated on

Legendary leg spinner Muttiah Muralitharan Praise India's Spin Bowling:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच टी20 मालिका पार पडली. या टी20 मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.

या मालिकेत 23 वर्षीय फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी नोंदवली. तसेच अक्षर पटेलनेही या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांचे दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने देखील कौतुक केले आहे.

Axar Patel - Ravi Bishnoi | Muttiah Muralitharan
IND vs AUS: परंपरा कायम! पहिली टी20 मालिका जिंकताच कर्णधार सूर्यकुमारने कोणाकडे सोपवली ट्रॉफी, पाहा Video

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेचा पाचवा सामना बंगळुरूला पार पडला, या सामन्यापूर्वी जिओ सिनेमाशी बोलताना मुरलीधरन म्हणाला, 'भारताच्या प्रत्येक पिढीमध्ये चांगले फिरकीपटू पाहायला मिळाले आहेत. तुम्ही पाहा अनिल कुंबळे पासून ते आर अश्विनपर्यंत आणि आता नवे युवा फिरकीपटू समोर येत आहेत.'

'बिश्नोई इतर कोणत्याही लेग स्पिनरपेक्षा वेगळा आहे. तो वेगात चेंडू टाकतो आणि चेंडू स्लाईडही खूप करतो. अक्षरही खूप अचूक असतो. तो चेंडू खूप वळवत नाही आणि वॉशिंग्टन सुंदरही त्याच्यासारखाच आहे. कारण तो देखील चेंडू खूप वळवत नाही आणि तोही खूप अचूक आणि वेगवान आहे.'

Axar Patel - Ravi Bishnoi | Muttiah Muralitharan
IND vs AUS: रवी बिश्नोईच्या फिरकीची जादू! 9 विकेट्ससह आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत रवी बिश्नोईने सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. त्याने गेल्या काही सामन्यांपासून चांगली कामगिरी केली.

त्यामुळे सध्या त्याच्याकडे युजवेंद्र चहलचा पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे, तसेच पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीही तो भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने प्रबळ दावेदार आहे.

अक्षर पटेलबाबत सांगायचे झाले, तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या आणि पाचव्या अशा सलग 2 सामन्यांत सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्याच्याकडे खालच्या फळीत फलंदाजी करण्याचीही क्षमता असल्याने तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरताना दिसतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com