Test Ranking: अश्विन गोलंदाजांमध्ये, तर जडेजा अष्टपैलूंमध्ये अव्वल; पोप-रुटनेही घेतली मोठी झेप

ICC Test Ranking: आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत आर अश्विनने गोलंदाजीत आणि रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.
R Ashwin | Ravindra Jadeja
R Ashwin | Ravindra JadejaDainik Gomantak

Latest ICC Test Ranking:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने गोलंदाजी यादीत अव्वल क्रमांक कायम राखला आहे.

नुकताच भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. यानंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली आहे.

अश्विनने इंग्लंडविरुद्ध हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटीत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो सध्या 853 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच भारताचा जसप्रीत बुमराहनेही एका स्थानाने प्रगती केली असून तो आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.

R Ashwin | Ravindra Jadeja
ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील उठवली बंदी, 'या' कारणामुळे करण्यात आली होती कडक कारवाई

या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कागिसो रबाडा आणि तिसऱ्या क्रमांकावर पॅट कमिन्स आहे.

दरम्यान गोलंदाजी यादीत वेस्ट इंडिजकडून शानदार कामगिरी केलेल्या शेमार जोसेफने 42 स्थानांची प्रगती करत 50 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच केमार रोच दोन स्थानांनी वर येत 17 व्या क्रमांकावर आला आहे, तर अल्झारी जोसेफनेही 4 क्रमांकाची प्रगती करत 33 वा क्रमांक मिळवला आहे.

R Ashwin | Ravindra Jadeja
IND vs ENG: बुमराहवर ICC कडून मोठी कारवाई! इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान झाली 'ही' चूक

फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल सांगायचे झाल्यास भारताविरुद्ध 196 धावांची खेळी केलेल्या ऑली पोपने मोठी झेप घेतली आहे. त्याने 20 स्थांनांची प्रगती करत 15 वा क्रमांक मिळवला आहे. फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर केन विलियम्सन कायम आहे, तर जो रुट दुसऱ्या आणि स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

दरम्यान, पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. विराट सहाव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी अर्धशतक केलेल्या उस्मान ख्वाजाने दोन स्थानांची प्रगती करत आठवा क्रमांक मिळवला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर रविंद्र जडेजा आणि दुसऱ्या क्रमांकावर आर अश्विन कायम आहे. या क्रमवारीत इंग्लंडच्या जो रुटने मोठा प्रगती केली आहे. त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम चौथे स्थान मिळवले आहे. त्याने भारताविरुद्धच्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com