ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील उठवली बंदी, 'या' कारणामुळे करण्यात आली होती कडक कारवाई

Sri Lanka Cricket Board: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका क्रिकेट बोर्डा (SLC) वरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे.
Sri Lanka Team
Sri Lanka TeamDainik Gomantak

Sri Lanka Cricket Board: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका क्रिकेट बोर्डा (SLC) वरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान आयसीसीने गेल्या वर्षी बोर्डाला निलंबित केले होते. विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती.

ICC ने रविवारी एक निवेदन जारी केले की, SLC ला 10 नोव्हेंबर 2023 रोजी जबाबदारीचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. आयसीसी बोर्ड निलंबनापासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आता समाधानी आहे की SLC त्याच्या सदस्यत्वाच्या दायित्वांचे उल्लंघन करत नाही.

तथापि, निलंबनानंतरही श्रीलंकेला द्विपक्षीय क्रिकेट आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु आयसीसीने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून दक्षिण आफ्रिकेकडे सोपवले. श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी SLC ची प्रशासकीय समिती बरखास्त करुन माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम समिती स्थापन केली होती. अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर रणसिंघे यांनी हे पाऊल उचलले होते.

Sri Lanka Team
ICC Awards: ऑस्ट्रेलियन कर्णधार सर्वोत्तम क्रिकेटर, तर विराट, ख्वाजाचाही 'या' पुरस्कारांनी गौरव; पाहा विजेत्यांची यादी

दरम्यान, आयसीसीने रणसिंघे यांची ही कृती सरकारी हस्तक्षेप असल्याचे मानले होते. आयसीसीने एसएलसीला निलंबित केले, असे सांगून बोर्ड आपल्या कारभारात सरकारी हस्तक्षेप नसल्याचे सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरले. हे जागतिक संस्थेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

रणसिंघे यांच्यानंतर क्रीडा मंत्री म्हणून आलेले हरिन फर्नांडो म्हणाले होते की, आयसीसीचे निलंबन मागे घेण्याच्या उद्देशाने श्रीलंका क्रिकेटसाठी अंतरिम समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. विशेष म्हणजे, एसएलसी अडचणीत आल्यानंतर श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी 27 नोव्हेंबर रोजी रणसिंघे यांना बडतर्फ केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com