IND vs ENG: बुमराहवर ICC कडून मोठी कारवाई! इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान झाली 'ही' चूक

Jasprit Bumrah: आयसीसीने माहिती दिली आहे की इंग्लंडविरुद्ध हैदराबादला झालेल्या कसोटीतदरम्यान जसप्रीत बुमराहकडून झालेल्या चूकीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahX/ICC
Published on
Updated on

Jasprit Bumrah reprimanded for breaching ICC Code of Conduct during India vs England first Test in Hyderabad:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका चूकीसाठी आयसीसीने फटकारले असून कारवाईही केली आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी (28 जानेवारी) आयसीसीच्या आचार संहितेतील नियमातील लेव्हल-1 चे उल्लंघन केल्यामुळे बुमराहला फटकारले आहे. तसेच त्याला एक डिमिरीट पाँइंटही देण्यात आला आहे. हा त्याची ही 24 महिन्यातील पहिली चूक होती.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: जेव्हा अश्विनच्या समोरच बुमराह करतो गोलंदाजीची नक्कल, पाहा Video

तसेच आयसीसीने सांगितले आहे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावावेळी ८१ व्या षटकात ऑली पोप धाव घेण्यासाठी धावत असताना बुमराह जाणून बुजून त्याच्या मध्ये आला होता. ज्यामुळे त्यांच्या चूकीच्या पद्धतीने एकमेकांना धडकले.

त्यामुळे बुमराहकडून आयसीसीच्या आचार संहितेतील कलम २.१२ चे उल्लंघन झाले आहे. खेळाडूंबरोबर किंवा सपोर्ट स्टाफबरोबर किंवा पंच, सामनाधिकारी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीशी (यात आंतरराष्ट्रीय सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचाही समावेश आहे.) अयोग्य पद्धतीने शारिरीक संपर्क येण्याबद्दल आहे.

Jasprit Bumrah
IND vs ENG: इंग्लंडने जिंकली हैदराबाद कसोटी! भारताला मायदेशातच मात देण्यात 'या' 5 इंग्लिश शिलेदारांचे मोलाचे योगदान

बुमराहवर मैदानातील पंच पॉल रिफेल, ख्रिस गॅफने, तिसरे पंच मराईज इरॅसमस आणि चौथे पंच रोहन पंडीत यांनी आरोप लावले. दरम्यान बुमराहने आरोप मान्य केले असून सामनाधिकारी रिची रिचर्सडसन यांनी केलेली कारवाई देखील मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सुनावणी होणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

पहिल्या सामन्यात बुमराहने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, इंग्लंडने पहिला सामना जिंकला असल्याने सध्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com