All England Open Badminton 'लक्ष्य' सेन 21 वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवणार?

लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली
Lakshya Sen
Lakshya SenTwitter

भारताला 21 वर्षांनंतर मोठी बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनने (Lakshya Sen) ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या (England Open Badminton) अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली जी जियाचा पराभव केला. लक्ष्यने गतविजेत्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा तीन गेमच्या लढतीत पराभव करून अंतिम फेरीसाठी आपले तिकीट कापले आहे.

Lakshya Sen
ICC Women's World Cup: भारताचं भविष्य आता पाकिस्तानच्या हातात, जाणून घ्या

76 मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये लक्ष्यने एकतर्फी आघाडी घेतली, तर दुसऱ्या गेममध्ये जियाने एकतर्फी सेट जिंकला. या सामन्यातील तिसरा गेम खूपच रंजक ठरला. तिसऱ्या गेममध्ये जिया एकवेळ 17-16 अशी आघाडीवर होता, पण त्यानंतर लक्ष्यने पुनरागमन करत हा गेम 21-19 असा मनोरंजक पद्धतीने जिंकून उपांत्य फेरी गाठली. आता अंतिम फेरीत लत्रचा सामना ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन विरुद्ध चौ तिएन चेन यांच्यातील विजेत्याशी होईल.

Lakshya Sen
IPL 2022: गौतम का झाला होता विराटबाबत 'गंभीर'

आतापर्यंत केवळ दोन भारतीय बॅडमिंटन खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे. 1947 मध्ये प्रकाश नाथ, 1980 आणि 1981 मध्ये प्रकाश पदुकोण, 2001 मध्ये पुलेला गोपीचंद आणि 2015 मध्ये सायना नेहवाल या पाच भारतीय खेळाडूंनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. यातील केवळ दोन दिग्गजांना स्पर्धा जिंकण्यात यश आले. प्रकाश पदुकोण 1980 मध्ये आणि पुलेला गोपीचंद 2001 मध्ये ही स्पर्धा जिंकली. 20 वर्षीय लक्ष्यने अंतिम सामना जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com