Ranji Trophy 2024: पृथ्वी शॉ ची अफलातून खेळी! फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीतील ठोकले 13 वे शतक

Prithvi Shaw Century: भारतीय संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत शानदार शतक झळकावले.
Prithvi Shaw Century Ranji Trophy 2024
Prithvi Shaw Century Ranji Trophy 2024Dainik Gomantak

Prithvi Shaw Century Ranji Trophy 2024:

भारतीय संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत शानदार शतक झळकावले. सलामीवीर पृथ्वी शॉ याने मुंबईकडून खेळताना आणि छत्तीसगडविरुद्ध फलंदाजी करताना अवघ्या 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे.

वास्तविक, भारतीय संघ सध्या केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या दुखापतींशी झुंजत आहे, तर दुसरीकडे विराट कोहलीही वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे.

छत्तीसगडविरुद्ध शतक ठोकले

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या रणजी ट्रॉफी 2024 मध्ये मुंबईकडून खेळत आहे. बंगालविरुद्ध दुखापतीनंतर शॉने पुनरागमन केले, मात्र त्याला केवळ 35 धावा करता आल्या. मुंबईने तो सामना अगदी सहज जिंकला. मात्र छत्तीसगडविरुद्ध फलंदाजी करताना शॉने अवघ्या 43 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शॉने आक्रमक पद्धतीने आपल्या शतकाकडे वाटचाल सुरु केली. पृथ्वी शॉने अवघ्या 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. शॉने आपल्या शतकी खेळीत 13 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले.

पृथ्वी शॉने कारकिर्दीतील तेरावे शतक झळकावले

पृथ्वी शॉ काही काळ दुखापतीशी झुंजत होता, त्यामुळे सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट, विजय हजारे ट्रॉफी आणि या रणजी मोसमाच्या पूर्वार्धात मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यास तो मुकला होता. पण या शतकासह त्याने शानदार पुनरागमन केले. पृथ्वी शॉच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील हे 13 वे शतक आहे, जे 80 व्या डावात आले.

Prithvi Shaw Century Ranji Trophy 2024
Ranji Trophy: खराब कामगिरीचा अर्जुन तेंडुलकरला फटका; रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती

भारताकडून पदार्पणातच शतक ठोकले होते

पृथ्वी शॉने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्याच सामन्यात त्याने शतक झळकावले होते. शॉने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 339 धावा केल्या आहेत. कसोटी व्यतिरिक्त शॉने भारतासाठी 6 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ 189 धावा केल्या आहेत. शॉने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण सामना खेळला होता. कसोटी आणि एकदिवसीय व्यतिरिक्त शॉने भारतासाठी 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला आहे. ज्यामध्ये तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

Prithvi Shaw Century Ranji Trophy 2024
Ranji Cricket Trophy: पंजाबने उडवला गोव्याचा धुव्वा; तासाभरातच विजयाला गवसणी

भारतीय संघात पुनरागमन अपेक्षित आहे

पृथ्वी शॉने भारतासाठी (India) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पासून तो भारतीय संघाबाहेर आहे. मात्र, पृथ्वी शॉच्या या कामगिरीनंतर निवड समिती शॉला आणखी एक संधी देण्याचा विचार करु शकते. गेल्या काही वर्षांत शॉने त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या फिटनेसवरही खूप मेहनत घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com