IND vs ENG: धरमशालामध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? 2017 मध्ये कांगारुंचा उडवला होता धुव्वा

India Test Record In Dharamsala Stadium: शेवटच्या सामन्यातील विजयासह, संघ 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करेल.
India Test  Record In Dharamsala Stadium
India Test Record In Dharamsala StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

India Test Record In Dharamsala Stadium: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना गुरुवारपासून धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेत 3-1 अशी अजिंक्य आघाडी कायम ठेवली आहे.

शेवटच्या सामन्यातील विजयासह, संघ 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करेल. या सायकलमध्ये भारत आठ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. इंग्लंडचा संघ आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, इथे आम्ही तुम्हाला धरमशालामध्ये भारताचा रेकॉर्ड कसा आहे याबद्दल सांगणार आहोत.

दरम्यान, भारताने धरमशालामध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. 2017 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळला होता. याशिवाय, संघाने तीन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या मैदानावर एक टी-20 आणि दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळला होता, ज्यामध्ये संघाने 4 गडी राखून विजय मिळवला होता.

India Test  Record In Dharamsala Stadium
IND vs ENG: बेअरस्टोचे 'शतक' नक्की, तर 'या' गोलंदाजाचे पुनरागमन; धरमशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 जाहीर

भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी (2017)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून तिसरा सामना धरमशाला येथे खेळवला गेला. या सामन्यापूर्वी विराट कोहली संघातून बाहेर पडला होता. त्यावेळी, अजिंक्य रहाणेला पहिल्यांदाच कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.

दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 300 धावा केल्या होत्या. कुलदीपने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर 32 धावांची आघाडी घेतली होती.

नॅथन लायनने पाच विकेट घेतल्या होत्या. यानंतर उमेश यादव, अश्विन आणि जडेजाने ऑस्ट्रेलियाला केवळ 137 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात कर्णधार रहाणे आणि राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 8 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकाही 2-1 अशी जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com