Korea Open: पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत!

पीव्ही सिंधूला दुसऱ्या मानांकित दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
PV Sindhu
PV SindhuDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पाल्मा स्टेडियमवर शनिवारी कोरिया ओपन (Korea Open) बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 (Badminton Championships 2022) च्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूला (PV Sindhu) दुसऱ्या मानांकित दक्षिण कोरियाच्या (South Korea) एन सेयुंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आहे. (Korea Open PV Sindhu in semifinals)

PV Sindhu
T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

सुरुवातीच्या गेमपासूनच, जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या शटलरने 3-0 अशी आघाडी घेत धमाकेदार सुरुवात केली आणि तिने दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूला 21 च्या फरकाने गेम जिंकण्याच्या जवळ येऊ दिले नाही.

दुसऱ्या गेममध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने पहिल्या गेममध्ये 3-0 ने आघाडी घेत सुरुवात केली परंतु कोरियनने सलग पाच गुण जिंकून 5-3 अशी आघाडी केली. ही लढत 9-9 अशी होती, पण त्यानंतर स्थानिक मुलीने चार गुण मिळवून 13-9 अशी आघाडी घेतली आणि सिंधूने दुसरा गेम 17-21 असा गमावल्याने तिने तिथून मागे वळून पाहिले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

PV Sindhu
CK Nayudu Trophy : स्पर्धेतील विजयासह गोव्याच्या मोहिमेचा समारोप

पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीचा सामना 49 मिनिटांत 14-21, 17-21 असा हरवल्याने तो खेळ तिथेच संपला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com