इंडियन प्रीमियर लीग (IPL), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा स्टार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) त्याची पत्नी आणि इंटिरियर डिझायनर साची मारवाह यांच्यासोबत खूप प्रेमळ नातं आहे. दोघंही एकमेकांसोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करतात.
पण, एकदा नितीशला सांचीशी (Saachi Marwah) खोटे बोलावे लागले कारण ती त्याला एका ठिकाणी जाण्यासाठी मनाई करत होती.
नितीश राणाला कॅसिनोमध्ये जायचे होते. त्याला कॅसिनो काय असते, त्यात नेमकं काय होते हे त्याला जाणून घ्यायचे होते. कॅसिनो मधील जग हे स्वप्नवत आहे असं नितीशला वाटायचे. जेवणही तिथे मोफत मिळते. असे त्याला समजले होते.
नितीश यांना या सर्व गोष्टी अनुभवायच्या होत्या. सांचीला राग येऊ नये आणि तो कॅसिनोमध्ये गेला हे तिला कळू नये यासाठी त्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक युक्ती करायचे ठरवले.
नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांनी अलिकडे एका टीव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. याशोमध्ये त्याने गोव्यातील त्याचा अनुभव सांगितला. पत्नीशी कधी खोटे बोलला होतास का? असे नितीशला विचारण्यात आले.
यावर नितीश म्हणाला, मी एकदा गोव्याला गेलो होतो. मला कॅसिनोमध्ये जायचे होते. मी जुगार खेळत नाही आणि मद्यपान करत नाही, पण, मला कॅसिनोमध्ये जायचे होते. सांचीने तसे करण्यास नकार दिला होता, पण मला काहीही करून कॅसिनोमध्ये काय होते, ते कसे दिसते हे जाणून घ्यायचे होते.
नितीश म्हणाला की, कॅसिनोमध्ये फ्री डिनर असतो, तुम्ही काहीही खाऊ शकता असे ऐकले होते. मग मी सांचीला फोनवर खोटे बोललो की मी झोपणार आहे, आपण उद्या बोलू. मी त्याला म्हणालो उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. माझा एक सामना आहे आणि त्याआधी मला सराव करायचा आहे. असे मी तिला सांगितले.
सांचीला वाटले की मी झोपलो आहे. पण, मी रात्रभर कॅसिनोमध्ये होतो आणि पहाटे साडेपाच नंतर तिथून निघालो. असे नितीश राणाने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.