Chandrakant Pandit KKR New Head Coach: IPL संघ कोलकाता नाईट रायडर्सला नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. केकेआरचा मालक शाहरुख खानने याची घोषणा करत चंद्रकांत पंडित कोलकाता नाईट रायडर्सचे नवे प्रशिक्षक असतील असे सांगितले. चंद्रकांत पंडित यांच्या आधी केकेआरचे मुख्य प्रशिक्षक न्यूझीलंडचे माजी दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम होते. पण आता तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक बनला आहे. तेव्हापासून केकेआर नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होती.
कोचिंगमध्ये पंडित यांची कारकीर्द चमकदार
पंडित यांची कोचिंगमध्ये खूप यशस्वी कारकीर्द आहे. त्याच्या कोचिंगमध्ये वेगवेगळ्या संघांनी रणजी ट्रॉफीवर कब्जा केला आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबईने 2003, 2004, 2016 मध्ये रणजी करंडक, 2018-19 मध्ये विदर्भ आणि या वर्षी 2022 मध्ये मध्य प्रदेशने रणजी करंडक जिंकला आहे. KKR च्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करताना, या फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वेंकी म्हैसूर म्हणाले की, चंदू आयपीएलच्या पुढील हंगामापासून आमच्या संघाचे नेतृत्व करेल याचा आम्हाला खूप आनंद आहे.
केकेआरसोबतचा रोमांचक प्रवास असेल
चंद्रकांत पंडितचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आहे. आता ते प्रशिक्षक म्हणून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाची धुरा सांभाळणार आहे. केकेआरच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंडित म्हणाले की, ही जबाबदारी मिळणे हा मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. नाईट रायडर्सशी संबंधित असलेल्या खेळाडूंकडून आणि इतरांकडून मी कौटुंबिक संस्कृतीबद्दल, तसेच यशाच्या परंपरेबद्दल ऐकले आहे. सेटअपचा एक भाग असलेल्या सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंच्या गुणवत्तेबद्दल मी उत्साहित आहे आणि मी नम्रतेने आणि सकारात्मक अपेक्षांसह या संधीची वाट पाहत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.