MS Dhoni Surgery: धोनीच्या गुडघ्यावर सर्जरी करणारे डॉक्टर आहेत कोण अन् किती घेतात फी? पंतवरही केलेत उपाचार

आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak

MS Dhoni Knee Surgery: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने नावावर केले. पण यानंतर लगेचच धोनी मुंबईत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्यानंतर आता त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे.

एमएस धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे त्याने त्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

या हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली आहे. डॉ. परदीवाला हे कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख, आणि आर्थ्रोस्कोपी अँड शोल्डर सर्विसचे संचालक आहेत.

MS Dhoni
MS Dhoni Stumping: 0.12 sec... गिलचा काटा काढायला लागला एवढा वेळ; एकदा व्हिडिओ पाहाच

डॉक्टर परदीवाला हे नामांकिस सर्जन असून त्यांना जवळपास 23 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक स्टार भारतीय खेळाडूंवर उपचार केले आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावरही त्यांनीच शस्त्रक्रिया केली होती.

याशिवाय त्यांनी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, पीव्ही सिंधू, सुशील कुमार, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, योगेश्वर दत्त अशा अनेक खेळाडूंवर उपचार केले आहेत.

डॉक्टर परदीवाला हे बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीचेही सदस्य आहेत. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले असून त्यांनी एमएस (ऑर्थोपेडिक्स), डीएनबी (ऑर्थोपेडिक्स) आणि एफसीपीएस याचेही शिक्षण घेतले आहे. त्यांना हिंदी, इंग्लिंश, गुजराती आणि मराठी भाषा बोलता येतात. त्यांना अनेक पुरस्कारांनीही आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांच्या फीबद्दल सांगायचे झाल्यास काही रिपोर्ट्सनुसार त्यांची कन्सल्टिंग फी 2500 रुपये आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी विविध गोष्टींचा विचार करता वेगवेगळा खर्च येतो.

MS Dhoni
Ravindra Jadeja on MS Dhoni: 'आयपीएल 2023 विजेतेपद धोनीसाठीच...' जडेजाच्या वक्तव्याने जिंकली कोट्यवधींची मनं

धोनीने दुखऱ्या गुडघ्यानेच खेळले आयपीएल

धोनी आयपीएल 2023 मध्ये अनेकदा त्याच्या डाव्या गुडघ्याला नी कॅप लावताना दिसला होता. तसेच त्याने उघडपणे तो गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही त्याने खेळण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर त्याने आता त्यावर शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

धोनीने आयपीएल 2023 मध्ये खालच्या फळीत खेळताना 16 सामन्यांमध्ये 182.46 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. यामध्ये तो 8 वेळा नाबादही राहिला. त्याने या हंगामात एकूण 10 षटकार मारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com