IND vs BAN, 1st Test: पंत असताना पुजारा उपकर्णधार, केएल राहुल म्हणतोय, 'मला माहित नाही...'

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल कर्णधारपद आणि चेतेश्वर पुजारा उपकर्णधारपद सांभाळणार आहेत.
Cheteshwar Pujara and Rishabh Pant
Cheteshwar Pujara and Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs BAN, 1st Test: बुधवारपासून बांगलादेश विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याला भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मुकणार आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.

त्यामुळे आता पहिल्या सामन्यात केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पण, ऋषभ पंत संघात असताना पुजाराला उपकर्णधार केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत पंतने भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद सांभाळले होते. त्यावेळी पुजाराही संघात होता.

तसेच पंत, बुमराह, केएल राहुल या खेळाडूंकडे भारताचे भविष्यातील कसोटी कर्णधार म्हणून पाहिलेही जात आहे. पण असे असताना आता बांगलादेशविरुद्ध पुजाराला उपकर्णधार केल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दल आता केएल राहुलनेच प्रतिक्रिया दिली आहे.

(KL Rahul on team India's vice captaincy)

Cheteshwar Pujara and Rishabh Pant
Team India: धक्का! टीम इंडियाच्या 'या' धाकडने हॉस्पिटलमधून दिली मोठी अपडेट

केएल राहुल म्हणाला, 'कमीत कमी मला तरी माहित नाही की यासाठी काय निकष असतात. ज्याला निवडलेलं असतं, त्याच्या पाठीवर एक थाप द्या. अगदी मलाही जेव्हा उपकर्णधार करण्यात आले होते, तेव्हा मला आनंद झाला होता. त्यावेळी तुमच्याकडे संघाची जबाबदारी येते. यामुळे फार काही बदलत नाही.'

'सर्वांना त्यांची भूमिका जबाबदारी आणि संघ त्यांच्या योगदानाबद्दल किती कौतुक करतो हे माहिती आहे. ऋषभ आणि पुजारा, दोघेही आमच्या संघासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी त्यांची भूमिका अनेकदा चोख पार पाडली आहे. आम्ही इतका विचार करत नाही. आम्ही संघ म्हणून पुढे जातो.'

Cheteshwar Pujara and Rishabh Pant
KL Rahul-Athiya Shetty Marriage: के. एल. राहुलला BCCI कडून रजा मंजूर; जानेवारीत करणार लग्न?

दरम्यान, पहिल्या कसोटीतून रोहित शर्मा बाहेर गेल्याने त्याच्याऐवजी बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनची भारतीय संघात निवड झाली आहे. आता त्याला अंतिम 11 जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळणार की नाही, हे पाहावे लागेल.

तसेच मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा देखील बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर गेल्याने त्यांच्याऐवजी सौरभ कुमार आणि नवदीप सैनीला संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जयदेव उनाडकटचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com