KL Rahul-Athiya Shetty Marriage: के. एल. राहुलला BCCI कडून रजा मंजूर; जानेवारीत करणार लग्न?

अभिनेत्री अथिया शेट्टीशी तीन वर्षांपासून आहे रिलेशनशिपिमध्ये
Athiya Shetty and KL Rahul Marriage
Athiya Shetty and KL Rahul MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

KL Rahul-Athiya Shetty Marriage: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने अर्थात BCCI ने क्रिकेटपटू के. एल. राहुल याला पर्सनल लीव्ह मंजूर केली आहे. त्यामुळेच के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी हे दाम्पत्य लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Athiya Shetty and KL Rahul Marriage
Ranveer Singh Joins Golmaal 5: 'गोलमाल 5'मध्ये अजय देवगणची जागा घेणार रणवीर सिंग?

गेल्या काही वर्षांपासून राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी हे दोघे डिनरडेटवेळी, एकत्र फिरताना दिसले आहेत. दोघांच्या रिलेशनविषयी बऱ्याचदा प्रसारमाध्यमांतून छापून देखील आले आहे. पण दोघांनीही रिलेशनशिपबाबत अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नव्हते.

ताज्या माहितीनुसार राहुलने जानेवारीत रजा घेतली आहे. आणि याच काळात तो अथियासोबत लग्न करू शकतो. तथापि, अद्याप लग्नाबाबत काहीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही दिवसांपुर्वी या दोघांच्या कॉमन फ्रेंडने हे दाम्पत्य लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

तसेच अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांनाही अथिया-राहुल यांचे लग्न कधी होणार, असे विचारले गेले होते तेव्हा त्यांनीही लवकरच होईल, असे उत्तर दिले होते. त्यापुर्वी एकदा बोलताना सुनील शेट्टी म्हणाले होते की, तेच ठरवतील कधी लग्न करायचे आहे. राहुल खूप व्यग्र आहे. जेव्हा त्यांना एक दीर्घ सुट्टी मिळेल तेव्हाच लग्न होईल. एका दिवसात लग्न होऊ शकत नाही.

Athiya Shetty and KL Rahul Marriage
Shahrukh Khan Upcoming Movie: किंग ऑफ रोमान्स आता 'अ‍ॅक्शन'च्या प्रेमात

राहुल आणि अथिया जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकत्र सुट्टीवर जाताना ते अनेकदा दिसून आले आहेत. सुरवातीला दोघांनीही बराच काळ आपले रिलेशन गुप्त ठेवले होते. भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असताना के. एल. राहुल सोबत अनेकदा अथिया शेट्टी दिसून आली आहे. अथियाने 2015 मध्ये सुरज पांचोलीसोबत 'हीरो' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com