Ishan Kishan: टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक झळकावत शानदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशानचा जन्म 18 जुलै 1998 रोजी पाटणा (बिहार) येथे झाला. ईशानने पटनाच्या मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली.
ईशान किशनचा जलवा
बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशानने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ईशानने 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दरम्यान, ईशान किशनचा स्ट्राइक रेट 160.31 राहिला आहे. ईशानच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतके झळकावली आहेत.
विश्वविक्रम मोडून इतिहास रचला
ईशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम गेलच्या नावावर होता, मात्र आता ईशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी
रोहित शर्मा - 264
मार्टिन गुप्टिल - 237*
वीरेंद्र सेहवाग - 219
ख्रिस गेल - 215
फखर जमान - 210*
ईशान किशन - 210
रोहित शर्मा - 209
रोहित शर्मा - 208*
सचिन तेंडुलकर - 200*
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.