West Indies vs India, 1st Test Yashasvi Jaiswal records: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. हा 21 वर्षीय जयस्वालचा पहिलाच कसोटी सामना असून त्याने शतक साजरे केले. याबरोबरच त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
एकवेळ पाणीपूरीचा ठेला चालवून संघर्ष करत क्रिकेट कारकिर्द घडवणाऱ्या जयस्वालने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात 215 चेंडूत त्याचे पहिले शतक झळकावले. तसेच तो या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत 350 चेंडूत 143 धावा करून नाबाद आहे.
त्याने हे शतक करताना कर्णधार रोहित शर्मा याच्याबरोबर द्विशतकी भागीदारीही केली. त्याच्यात आणि रोहित शर्मामध्ये 229 धावांची सलामीला विक्रमी भागीदारी केली. रोहित 103 धावांवर बाद झाल्यानंतर त्यांची भागीदारी तुटली.
तसेच जयस्वालने रोहितनंतर विराट कोहलीबरोबर देखील दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत 72 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने 162 धावांची आघाडी घेतली आहे.
यशस्वी जयस्वाल कसोटी पदार्पणात शतक करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 21 वर्षे 196 दिवस इतके वय असताना हे शतक केले. या यादीत अव्वल क्रमांकावर पृथ्वी शॉ आहे. शॉ याने 18 वर्षे 329 दिवस इतके वय असताना पदार्पणात कसोटी शतक केले होते.
18 वर्षे 329 दिवस - पृथ्वी शॉ (विरुद्ध, वेस्ट इंडिज, 2018)
20 वर्षे 126 दिवस - अब्बास अली बेग (विरुद्ध इंग्लंड, 1959)
20 वर्षे 276 दिवस - गुंडप्पा विश्वनाथ (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1969)
21 वर्षे 196 दिवस - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2023)
21 वर्षे 327 दिवस - मोहम्मद अझरुद्दीन (विरुद्ध इंग्लंड, 1984)
यशस्वी जयस्वाल भारताबाहेर कसोटी पदार्पणात करताना शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे, तर एकूण सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी भारताबाहेर कसोटी पदार्पण करताना अब्बास अली बेग, सुरिंदर अमरनाथ, प्रविण आमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांनी असा कारनामा केला आहे.
तसेच भारताबाहेर भारताकडून कसोटी पदार्पण करणाताना सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रमही जयस्वालच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने 1996 साली लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पदार्पण करताना 131 धावांची खेळी केली होती.
112 धावा - अब्बास अली बेग - (विरुद्ध इंग्लड, 1959)
124 धावा - सुरिंदर अमरनाथ - (विरुद्ध न्यूझीलंड, 1976)
103 धावा - प्रविण आमरे (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1992)
131 धावा - सौरव गांगुली - (विरुद्ध इंग्लंड, 1996)
105 धावा - विरेंद्र सहेवाग - (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2001)
120 धावा - सुरेश रैना - (विरुद्ध श्रीलंका, 2010)
143* धावा - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2023)
यशस्वी जयस्वाल कसोटी पदार्पणात शतक करणारा एकूण 17 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच तिसरा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी असा कारनामा शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी केला आहे.
शिखरने 2013 मध्ये मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करताना 187 धावांची खेळी केली होती. तसेच शॉ याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2018 रोजी राजकोटमध्ये कसोटी पदार्पण करताना 134 धावांची खेळी केली होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना शतक करणाराही जयस्वाल तिसरा फलंदाज ठरला अहे. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी असा कारनामा केला आहे. रोहितने 2013 मध्ये कोलकाता येथे खेळताना 177 धावांची खेळी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.