IPL 2023 मधून बाहेर पडला दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन, 'या' संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगणार!

Indian Premier League 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आयपीएल 2023 सुरु होत आहे.
Punjab Kings Team
Punjab Kings TeamDainik Gomantak

Indian Premier League 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आयपीएल 2023 सुरु होत आहे.

आयपीएलचा 16वा सीझन 31 मार्चपासून खेळवला जाणार आहे. ही लीग सुरु होण्यापूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे.

एक धडाकेबाज फलंदाज दुखापतीमुळे IPL 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर जाणार आहे. हा खेळाडू पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून या खेळाडूला खरेदी करण्यात आले.

हा खेळाडू आयपीएल 2023 मधून बाहेर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड क्रिकेट संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आगामी आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. पंजाब किंग्जने गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात त्याच्यावर 6.75 कोटी रुपये खर्च करुन त्याला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले होते.

Punjab Kings Team
IPL 2023: दुखापतग्रस्त जेमिसनच्या जागेवर CSK संघात दाखल झाला 'हा' धाकड वेगवान बॉलर

दुसरीकडे, बेअरस्टो गेल्या वर्षी दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, जॉनी बेअरस्टो या आयपीएलच्या तीन आठवड्यांनंतर जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऍशेसच्या तयारीवर लक्ष केंद्रित करेल.

आयपीएलमधील आश्चर्यकारक आकडेवारी

2019 मध्ये, जॉनी बेअरस्टो पहिल्यांदा आयपीएलचा भाग बनला. जॉनी बेअरस्टोने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 39 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 1291 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 9 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे.

त्याचवेळी, गेल्या मोसमात जॉनी बेअरस्टोने 11 सामने खेळताना 253 धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टोची या मोसमातून बाहेर पडणे पंजाब किंग्जसाठी मोठा धक्का ठरु शकतो.

आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.

Punjab Kings Team
IPL 2023: धाकड किवी ऑलराऊंडर RCB च्या ताफ्यात सामील! 'या' खेळाडूची घेणार जागा

आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्जचा संघ:

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, सॅम करण, सिकंदर रझा, हरप्रीत सिंग भाटिया, विद्वत कवेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com