IPL 2023: दुखापतग्रस्त जेमिसनच्या जागेवर CSK संघात दाखल झाला 'हा' धाकड वेगवान बॉलर

चेन्नई सुपर किंग्सने दुखापतग्रस्त काईल जेमिसनच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak
Published on
Updated on

Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण या हंगामापूर्वी काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने काही संघाना फटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सनेही या हंगामासाठी संघात घेतलेला काईल जेमिसन देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो या हंगामासाठी उपलब्ध नसेल.

त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सने त्याचा बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगनान गोलंदाज सिसांडा मंगला याला संघात सामील करून घेतले आहे. सीएसकेने जेमिसनला आयपीएल लिलावात 1 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण त्याच्या पाठीच्या दुखापतीने गेल्या महिन्यात पुन्हा डोके वर काढल्याने त्याला आगामी आयपीएल हंगामातून बाहेर व्हावे लागले.

Chennai Super Kings
IPL 2023: धाकड किवी ऑलराऊंडर RCB च्या ताफ्यात सामील! 'या' खेळाडूची घेणार जागा

दरम्यान, मंगला आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. पण आता त्याला सीएसकेने त्याच्या मुळ किंमतीत म्हणजेच 50 लाखात खरेदी केले आहे. तो आत्तापर्यंत एकदाही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे त्याला आगामी हंगामात आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते.

मंगला दक्षिण आफ्रिकेकडून 5 वनडे आणि 4 टी20 सामने खेळला आहे. त्याने यामध्ये मिळून 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पहिल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 8.68 च्या इकोनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या होत्या.

सिसांडा हा चांगला डेथ बॉलर म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे टी20 क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची क्षमता आहे. त्याने आत्तापर्यंत टी20 कारकिर्दीत 127 सामने खेळले असून 136 विकेट्स घेतल्या आहेत.

Chennai Super Kings
IPL 2023: आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके कोणी ठोकली? पाहा टॉप-5 लिस्ट!

दरम्यान, सीएसके संघ यंदा 3 वर्षांनंतर त्याच्या घरच्या मैदानात म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर सामने खेळताना दिसणार आहे. तसेच आगामी आयपीएल हंगामाचा सलामीचा सामना देखील चेन्नई सुपर किंग्स संघ खेळणार आहे.

सीएसकेला आयपीएल 2023 मधील पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. सीएसके एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना 3 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com