IPL 2023: धाकड किवी ऑलराऊंडर RCB च्या ताफ्यात सामील! 'या' खेळाडूची घेणार जागा

आगामी आयपीएल हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूला 1 कोटी रुपयात संघात सामील करून घेतले आहे.
RCB
RCBDainik Gomantak

Michael Bracewell joins RCB for IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी सर्वच संघांची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटकाही बसला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही समावेश आहे.

आरसीबीने 3.2 कोटी रुपयांना खरेदी केलेला इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्स दुखापतीमुळे आगामी आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून आरसीबीने न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मायकल ब्रेसवेलशी करार केला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामातून ब्रेसवेल आरसीबीकडून पदार्पण करू शकतो.

RCB
WPL 2023: सलग पाच पराभवानंतरही RCB करू शकते प्लेऑफसाठी क्वालिफाय, कसं ते घ्या जाणून

आरसीबीने ब्रेसवेलला लिलावादरम्यान असलेल्या त्याच्या मुळ किंमतीत म्हणजेच 1 कोटी रुपयात संघात सामील करून घेतले आहे. ब्रेसवेल न्यूझीलंड संघातील उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने भारताविरुद्ध जानेवारीमध्ये झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरीही केली होती. एका वनडेत त्याने 140 धावांची शतकी खेळी देखील केलेली.

आता आरसीबी संघातील परदेशी खेळाडूंमध्ये ब्रेसवेलचीही भर पडली आहे. आयपीएल 2023 हंगामासाठी आरसीबी संघात ब्रेसवेलबरोबरच कर्णधार फाफ डू प्लेसिस, वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, ग्लेन मॅक्सवेल, रिस टोप्ली, डेव्हिड विली आणि फिन ऍलेन हे परदेशी खेळाडू आहेत.

ब्रेसवेलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 113 धावा केल्या आहेत आणि 21 विकेट्स घेतल्या आहेत.

RCB
WPL 2023: किंग कोहलीचा मेसेज अन् RCB चा पहिला विजय! असं काय सांगितलं होतं ऐकाच

न्यूझीलंड संघातही बदल

ब्रेसवेलची आरसीबी संघात निवड झाल्याने न्यूझीलंडने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून मुक्त केले आहे. त्याच्याऐवजी वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडने रचिन रविंद्र याची संघात निवड केली आहे.

जॅक्सला झाली दुखापत

विल जॅक्सला नुकत्याच संपलेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान दुखापत झाली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे तो आगामी आयपीएलमधूनही बाहेर झाला.

दरम्यान, आयरपीएल 2023 स्पर्धेत आरसीबी संघ पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच आरसीबी संघ या मैदानावर आयपीएलचा सामना खेळताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com