U-17 WC: जपानच्या वेगापुढे फ्रान्सचे लोटांगण

महिला विश्वकरंडक स्पर्धेत टांझानियाने रचला इतिहास
Football
Football Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील दोन माजी विजेत्या संघांतील लढतीत जपानने घोडदौड कायम राखली, तर फ्रान्सला साखळी फेरीतच आटोपते घ्यावे लागले. फातोर्डा स्टेडियमवर मंगळवारी रात्री जपानने 2-0 फरकाने विजय नोंदवून सलग तिसरा सामना जिंकला. स्पर्धेच्या ड गटात जपानला 9 गुणांसह अव्वल क्रमांक मिळाला.

(Japan defeated France in the FIFA U-17 Women's World Cup)

Football
U-17 WC: मेक्सिकोला नमवत कोलंबिया उपांत्यपूर्व फेरीत दाखल

पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशाने इतिहास रचताना या स्पर्धेत पदार्पणात उपांत्यपूर्व फेरी गाठली. नवी मुंबई येथे टांझानियाने कॅनडास 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. बाद फेरीसाठी कॅनडास विजय अत्यावश्यक होता.

14 व्या मिनिटास अमांडा अ‍ॅलेन हिच्या गोलमुळे कॅनडास आघाडी मिळाली, मात्र 35 व्या मिनिटास व्हेरोनिका मापुंदा हिच्या गोलमुळे टांझानियाने बरोबरी साधली. टांझानियाने चार गुणांसह ड गटात दुसरा क्रमांक मिळविला. कॅनडाचे दोन गुणांसह, तर फ्रान्सचे एका गुणांसह आव्हान संपुष्टात आले.

Football
Women's T20: गोव्याचा एकतर्फी विजय; 'अरुणाचल'ची गोलंदाजी मात्र निष्फळ

जपानचे वर्चस्व

जपानने फ्रान्सवर पूर्ण वर्चस्व राखले. 2012 मध्ये स्पर्धा जिंकलेल्या फ्रान्सला विजय अत्यावश्यक होता. 2014 साली विजेतेपद, तर 2010 व 2016 मध्ये उपविजेतेपद मिळविलेल्या जपानने 29 व्या मिनिटास आघाडी घेतली. मोमोको तानिकावा हिने हा गोल केला. नंतर 90+1व्या मिनिटास बदली खेळाडू सायामी कुसूनोकी हिने जपानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेत जपानने 10 गोल केले, पण एकही गोल स्वीकारता उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला.

आगामी सामने: 22 ऑक्टोबर 2022 रोजी कोलंबिया विरुद्ध टांझानिया यांच्यात फातोर्डा येथे उपांत्यपूर्व फेरी सामना खेळला जाणार आहे. याच दिवशी जपान विरुद्ध स्पेन हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com