Women's T20: गोव्याचा एकतर्फी विजय; 'अरुणाचल'ची गोलंदाजी मात्र निष्फळ

विजयी लक्ष्य 8.1 षटकांत एक विकेट गमावून गाठले
Cricket
CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने मंगळवारी एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांनी कमजोर अरुणाचल प्रदेशवर नऊ विकेट राखून मात केली. 8.1 षटकांत विजयी लक्ष्य गाठताना फक्त एक विकेट गमावली.

(Goa women's cricket team beat Arunachal Pradesh team in Women's T20 cricket tournament)

Cricket
BCCI च्या वक्तव्याने पाकिस्तानला लागली मिरची, '2023 च्या वर्ल्ड कपसाठी...'

आसाममधील गुवाहाटी येथील बर्सापारा मैदानावर झालेल्या लढतीत अरुणाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी केली. त्यांना 9 बाद 62 धावाच करता आल्या. गोव्याने 1 बाद 65 धावा करून स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

गोव्याने आता पाच लढतीत तीन विजय व दोन पराभव अशी कामगिरी केली असून त्यांचे 12 गुण झाले आहेत. गोव्याच्या महिला संघाचा पुढील सामना गुरुवारी (ता. 20) बिहारविरुद्ध खेळला जाईल.

Cricket
T20 World Cup: पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऋषभ पंतला दुखापत? या फोटोंनी...

संक्षिप्त धावफलक

अरुणाचल प्रदेश: 20 षटकांत 9 बाद 62 ( नाबाम यापू 26, इला खान 18, शिखा पांडे 4-0-14-2, सुनंदा येत्रेकर 4-0-7-2, पूर्वा भाईडकर 3-0-5-2, निकिता मळीक 1-0-5-0, तेजस्विनी दुर्गड 4-0-9-1, मेताली गवंडर 2-0-11-0, संजुला नाईक 2-0-9-0) पराभूत वि. गोवा : 8.1 षटकांत 1 बाद 65 (इब्तिसाम शेख 10, संजुला नाईक नाबाद 22, शिखा पांडे नाबाद 26).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com