पणजी: कोलंबियाचा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनिमित्त गोव्यातील मुक्काम वाढला. क गटातील शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी मंगळवारी गतउपविजेत्या मेक्सिकोला 2-1 फरकाने नमवून गट विजेता बनून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
(Colombia defeated Mexico in the Under-17 Women's World Cup football tournament)
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत कोलंबिया, तसेच मेक्सिकोला विजयाची नितांत गरज होती. नवी मुंबईत गतविजेत्या स्पेन व चीन यांच्यातील लढतीतही अशीच परिस्थिती होती. शेवटची पाच मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या चीनवर 1-0 फरकाने मात करून स्पेनने बाद फेरी गाठली. कोलंबिया व स्पेन यांचे उपांत्यपूर्व फेरीतील सामने शनिवारी (ता. 22) फातोर्डा येथे खेळले जातील.
कोलंबियाने 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेची प्रथमच बाद फेरी गाठली. पाचव्यांदा ते मुख्य फेरीत खेळत आहेत. मंगळवारी त्यांच्यासाठी युआना ओर्तेगॉन हिने 41व्या मिनिटास पहिला गोल केला, नंतर 74व्या मिनिटास लिंडा कायसेदो हिच्या गोलमुळे दक्षिण अमेरिकेतील संघाची आघाडी 2-0 अशी मजबूत झाली.
81व्या मिनिटास लिंडा हिने स्वयंगोल केला, त्यामुळे मेक्सिकोची पिछाडी एका गोलने कमी झाली, मात्र चार वर्षांपूर्वी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या मेक्सिकोला यावेळेस साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.