Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

IND vs ENG: विराट कोहली संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, एका नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

Virat Kohli Withdraws From India England Series: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.

Virat Kohli Withdraws From India England Series:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी किंग कोहलीची निवड करण्यात आली होती, मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्याने आपले नाव मागे घेतले. तिसऱ्या कसोटीतून तो मालिकेत पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याने मालिकेतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा तो कोणत्याही घरच्या मालिकेत भाग घेणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीला कळवले आहे की, तो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून माघार घेत आहे, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले. राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघ ठरवण्यासाठी निवडकर्त्यांनी ऑनलाइन बैठक घेतली त्या दिवशी कोहलीने त्याच्या अनुउपलब्धतेबद्दल बीसीसीआयला कळवले.

Virat Kohli
IND vs ENG: पराभूत होऊनही इंग्लंडने केला 'हा' मोठा रेकॉर्ड; भारताविरुद्धच्या चौथ्या डावात पहिल्यांदाच...

दरम्यान, भारतीय संघात बदल झाल्याची बातमी आहे, आवेश खानच्या जागी आकाश दीपला संघात स्थान मिळू शकते. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात आकाशने इंग्लंड लायन्सविरुद्ध ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते पाहून निवड समिती आणि भारतीय कर्णधार रोहित प्रभावित झाले. या कारणामुळे त्याला या युवा खेळाडूला संधी द्यायची आहे. अशा परिस्थितीत आवेश खानला वगळले जाऊ शकते आणि तो पुन्हा रणजी खेळायला जाणार आहे.

Virat Kohli
IND vs ENG: सलग दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी केली निराशा, 600 हून अधिक धावा करुनही...

याशिवाय, दुखापतीमुळे विखाशापट्टणम कसोटी सामन्याला मुकलेले रवींद्र जडेजा आणि केएल राहुल तंदुरुस्त झाले आहेत आणि तिसऱ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध होतील, असे वृत्त आहे. या दोन ज्येष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघ संतुलित दिसेल. तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर असू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com