IPL 2023: मुंबई इंडियन्स संघात नव्या सदस्याची एन्ट्री, सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

मुंबई इंडियन्स संघात नवीन सदस्याचा समावेश झाला आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात नवीन सदस्याचा समावेश झाला आहे. मुंबई इंडियन्सने जे अरुणकुमार यांना आयपीएल 2023 हंगामासाठी सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

त्यामुळे आता अरुणकुमार हे मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होतील. मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये याआधीच टॅलेंट स्काऊट म्हणून विनय कुमार आहे. अरुण कुमार आणि विनय कुमार कर्नाटक संघाकडून एकत्र खेळले आहेत.

तसेच मार्क बाऊचरही मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य असून त्यांच्याबरोबर अरुणकुमार आयपीएल 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकत्र होते.

Mumbai Indians
IPL Auction 2023: स्टोक्स CSK संघात आल्यावर काय होती 'कॅप्टन कूल'ची प्रतिक्रिया, सीईओकडून खुलासा

अरुणकुमार यांनी देशांतर्गत क्रिकेट कर्नाटककडून खेळले असून या संघाला त्यांनी प्रशिक्षणही दिले आहे. आता ते आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघात कायरन पोलार्डसह काम करताना दिसतील. पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून त्याला आता मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.

अरुणकुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत 109 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 7208 धावा केल्या आहेत. तसेच 100 लिस्ट ए सामन्यांमध्ये 3227 धावा केल्या आहेत. त्यांनी 7 टी20 सामनेही खेळले असून त्यात 79 धावा केल्या आहेत.

अरुणकुमार यांनी जवळपास दोन वर्षे अमेरिका क्रिकेट संघाचेही प्रशिक्षणपद सांभाळले आहे. तसेच त्यांनी 2017 आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

Mumbai Indians
Boxing Day Test: मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी दिलेला गोलंदाज चमकला, अर्ध्या द. आफ्रिकेला धाडलं माघारी

मुंबई इंडियन्सने ग्रीनसाठी खर्च केले 17.50 कोटी

काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2023 हंगामासाठी लिलाव पार पडला. या लिलावात अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च केले. तो आयपीएलच्या लिलाव इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

मुंबई इंडियन्सने ग्रीनव्यतिरिक्त झाय रिचर्डसन (1.5 कोटी), ड्युआन यान्सिन (20 लाख), पियुष चावला (50 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णू विनोद (20 लाख), राघव गोयल (20 लाख) आणि नेहल वढेरा (20 लाख) यांनाही खरेदी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com