Boxing Day Test: मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी दिलेला गोलंदाज चमकला, अर्ध्या द. आफ्रिकेला धाडलं माघारी

Video: मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना खरेदी केलेल्या गोलंदाजाने बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी 5 विकेट्स घेतल्यात.
Cameron Green
Cameron Green Dainik Gomantak

Cameron Green: सोमवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये सुरू झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनने शानदार कामगिरी केली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी प्रथम दर्शनी योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 189 धावांवर सर्वबाद केले.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात ग्रीनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या थेयुनिस डी ब्रुइन (12), काइल व्हेरेने (52), मार्को यान्सिन (59), कागिसो रबाडा(4), लुंगी एन्गिडी (2) यांना बाद केले. यासह त्याने पहिल्यांदाच कसोटीत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली.

Cameron Green
Boxing Day Test नक्की आहे तरी काय अन् टीम इंडियाचा याच्याशी कसा संबंध?

मुंबई इंडियन्ससाठी ग्रीनला केलंय खरेदी

ग्रीनला आयपीएल 2023 हंगामासाठी मुंबई इंडियन्सने लिलावादरम्यान खरेदी केले आहे. त्याच्यासाठी मुंबईने 17.50 कोटी रुपये मोजले. त्यामुळे तो आयपीएल लिलावातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महागडा खेळाडूही ठरला आहे.

दरम्यान, त्याने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ बाद केल्याने सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Cameron Green
IPL Auction 2023: तब्बल 167 कोटींचा खर्च केल्यानंतर कसे आहेत सर्व 10 संघ, जाणून घ्या एका क्लिकवर

ऑस्ट्रेलियन गोलंदाजी चमकली

ग्रीन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने दोन विकेट्स घेतल्या. तसेच स्कॉट बोलंड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 67 धावांतच दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना माघारी धाडले होते.

पण, त्यानंतर काइल व्हेरेने आणि मार्को यान्सिन यांनी 112 धावांची भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाला स्थैर्य दिले. पण हे दोघे बाद झाल्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेला डाव संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरची विकेटही ग्रीननेच घेतली.

दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव संपल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांनी पहिल्या दिवसाखेर 1 बाद 45 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com