Team India
Team IndiaDainik Gomantak

IND vs BAN: 'या' खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन अशक्यच! रोहितच्या नेतृत्वाखाली...

India vs Bangladesh: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू एकही सामना खेळू शकला नाही, तर दुसरीकडे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या खेळाडूला अनेक संधी मिळाल्या.
Published on

Team India Tour Of Bangladesh: टीम इंडिया रविवारपासून (4 डिसेंबर) बांगलादेश दौऱ्याला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिले 3 वनडे आणि नंतर 2 कसोटी सामने खेळवले जातील. पण अनुभवी वेगवान गोलंदाज या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू एकही सामना खेळू शकला नाही, तर दुसरीकडे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या खेळाडूला अनेक संधी मिळाल्या.

या खेळाडूला स्थान मिळाले नाही

कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारखे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघातून गायब झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही इशांत शर्माला (Ishant Sharma) संघात स्थान मिळवता आले नाही. इशांतने नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाची (Team India) कमान अजिंक्य रहाणेच्या हाती होती.

Team India
IND vs BAN: भारत-बांगलादेश मालिकेपूर्वी संघात मोठा बदल, हा धाकड बनला नवा 'कर्णधार'

टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी खेळल्या

इशांत शर्माने 2007 साली टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 311 विकेट्स आहेत. इशांत आत्तापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो 115 विकेट घेण्यात यशस्वी ठरला, त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

Team India
IND A vs BAN A: जयस्वाल-ईश्वरनचा शतकी धमाका; टीम इंडियाने उभारला 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर

बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय कसोटी संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, सौरभ कुमार, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com