IND A vs BAN A: जयस्वाल-ईश्वरनचा शतकी धमाका; टीम इंडियाने उभारला 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर

भारत अ विरुद्ध बांगलादेश अ संघात अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि अभिमन्यू इश्वरन यांनी शतके केली आहेत.
Yashasvi Jaiswal and Abhimanyu Easwaran
Yashasvi Jaiswal and Abhimanyu EaswaranDainik Gomantak
Published on
Updated on

IND A vs BAN A: भारतीय अ संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला अनधिकृत कसोटी मालिका 29 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांनी शतके ठोकली.

या सामन्यात बांगलादेश अ संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 112 धावांवर संपला होता. त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात जयस्वाल आणि ईश्वरन या दोघांनीही दमदार सलामी देताना तब्बल 283 धावांची सलामी भागीदारी रचली. ही भागीदारी करताना या दोघांनीही शतकेही साजरी केली.

Yashasvi Jaiswal and Abhimanyu Easwaran
Team India: भारतीय खेळाडूंनी 'सुपर फॅन'चा दिवस बनवला स्पेशल, पाहा Video

जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 226 चेंडूत 145 धावा केल्या. या खेळीत त्याने 20 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तसेच ईश्वरनने (Abhimanyu Easwaran) 255 चेंडूत 142 धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर भारताची मधली फळी झटपट बाद झाली. यश धूलने 20 धावा, सरफराज खान 21 धावा आणि जयंत यादव 10 धावांवर बाद झाले.

दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून(Team India A) तिळक वर्मा 26 आणि उपेंद्र यादव 27 धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताने दुसऱ्या दिवसाखेर 117 षटकांत 5 बाद 404 धावा केल्या. याबरोबरच 292 धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने 3 विकेट्स आणि खलीद अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

Yashasvi Jaiswal and Abhimanyu Easwaran
Team India मध्ये संधी मिळालेल्या पाटीदारची कामगिरी राहिलीये धमाकेदार, पाहा आकडेवारी

तत्पूर्वी बांगलादेशकडून पहिल्या डावात मोसाद्देक होसेन सायकोटने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव केवळ 112 धावांत उरकला.

भारताकडून सौरभ कुमारने 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त नवदीप सैनीने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमारला 2 आणि अतित शेठलाही एक विकेट मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com