Australia
AustraliaDainik Gomantak

Women Ashes: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने अ‍ॅशेसवर केला कब्जा, इंग्लंडने गमावली मालिका

ऑस्ट्रेलियाने (Australia) मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 27 धावांनी पराभव करुन अ‍ॅशेसवरील आपला ताबा कायम ठेवला.

यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंड संघांसाठी अजिबात चांगला राहिला नाही. गेल्या महिन्यात जो रुटच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला अ‍ॅशेस मालिकेत 0-4 असा पराभव पत्करावा लागला होता, तर महिला संघालाही मल्टी-फॉर्मेटमधील महिला अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने (Australia) मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा (England) 27 धावांनी पराभव करुन अ‍ॅशेसवरील आपला ताबा कायम ठेवला. (Australia Beat England In The First ODI To Win The Ashes Series)

दरम्यान, कॅनबेरामध्ये गुरुवार, 3 फेब्रुवारीला खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी केली, परंतु संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियासाठी डावखुरा फलंदाज बेथ मुनीने सर्वाधिक 73 धावा (91 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार) केल्या, जिच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 205/9 धावा केल्या. तर दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशेषत: वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियासाठी अधिक अडचणी निर्माण केल्या. इंग्लंडसाठी सर्वोत्तम कामगिरी केट क्रॉसने केली, ज्याने 10 षटकांत 33 धावांत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज कॅथरीन ब्रंटनेही 3 बळी घेतले.

Australia
Women Ashes: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एलिसा हीली ने केला शर्मनाक रिकॉर्ड !

तसेच, प्रत्युत्तरात इंग्लंडच्या डावाची अवस्था आणखीनच बिकट झाली आणि केवळ 83 धावांत 5 विकेट पडल्या. संघाकडून अष्टपैलू नॅट सिव्हरने 46 धावा केल्या. ब्रंट आणि क्रॉसने शेवटी येऊन उत्तम कामगिरी क्रमाने केली. संपूर्ण संघ केवळ 178 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राउनने 34 धावांत 4 बळी घेतले. यासह ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेसवरचा ताबा कायम ठेवला.

Australia
Ashes मधील पराभवासाठी IPLला जबाबदार धरणाऱ्याला भारतीय प्रशिक्षक म्हणाले...

शिवाय, अ‍ॅशेस मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला तिन्ही एकदिवसीय सामने जिंकणे आवश्यक होते, परंतु तसे होऊ शकले नाही. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 8-4 गुणांची आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी 2-2 गुणांनी बरोबरीत राहीली. त्याचवेळी, तीन ट्वेटी-20 सामन्यांपैकी केवळ एकच सामना पूर्ण होऊ शकला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 2013-14 पासून अ‍ॅशेस मालिका कायम ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com