Ishan Kishan: ''मला वाईट वाटले...'' ईशान किशन असं का म्हणाला? जाणून घ्या

Ishan Kishan Reacts on Missing World Cup Place: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan Reacts on Missing World Cup Place: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने केवळ टीम इंडियालाच नाही तर संपूर्ण देशाला रडवले. आता या पराभवानंतरही खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने आता प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर, ईशानला संपूर्ण विश्वचषकात 11 पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली. नऊ सामन्यांसाठी संघाबाहेर राहण्यावरुन ईशानने प्रतिक्रिया दिली आहे.

ईशानने विश्वचषकात फक्त दोनच सामने खेळले

दरम्यान, ईशानने 2023 च्या विश्वचषकात (World Cup) दोन सामने खेळून 47 धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याला आपले खातेही उघडता आले नाही. तर दुसऱ्या सामन्यात त्याने (अफगाणिस्तानविरुद्ध) 47 धावांची खेळी केली. शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर किशनला संधी मिळाली नाही.

याबाबत किशन म्हणाला की, ''मला वाटते की आम्ही विश्वचषकात चॅम्पियन्सप्रमाणे खेळलो. मी बाहेर होतो आणि मला वाईट वाटत होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही खेळत नाही पण तुम्हाला तयार राहावे लागते आणि संधी मिळाल्यावर स्वत:ला सिद्ध करावे लागते. संधी मिळेल तेव्हा त्याचा फायदा घ्यायचा असतो.''

Ishan Kishan
Ishan Kishan: जेव्हा खुद्द ब्रायन लाराचा आलेला मेसेज, तेव्हा काय होती इशानची अवस्था, स्वत:च केला खुलासा

कोणत्या पोझिशनवर खेळायला आवडते?

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरु असलेल्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी आणखी फक्त 6 टी-20 सामने खेळणार आहे. त्या टूर्नामेंटमधील किशनच्या भूमिकेबद्दल, तो मालिकेतील दुसऱ्या टी-20 मधील विजयानंतर म्हणाला की, 'मला सलामी आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आवडते.

संघाची स्थिती काय आहे आणि कोणत्या प्रकारचा खेळ आवश्यक आहे हे एका क्षणी तुम्हाला कळते. जेव्हा मला असे वाटते की, मी गोलंदाजांवर ॲटक करु शकत नाही, तेव्हा मी माझ्या दुसऱ्या सहकारी फलंदाजाला सांगतो.'

Ishan Kishan
Ishan Kishan on Virat Kohli: इशानसाठी कोहलीनं दाखवलं 'विराट' मन! स्वत:चा बॅटिंग नंबर देताना सांगितलं, 'जा आणि...'

ईशान किशनचा रेकॉर्ड

दुसरीकडे, ईशाने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने भारतासाठी दोन कसोटी, 27 एकदिवसीय आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर द्विशतक आहे. ईशानच्या नावावर कसोटीतील तीन डावात एक अर्धशतकही आहे.

वनडेमध्ये त्याने एक शतक आणि सात अर्धशतकांसह 933 धावा केल्या आहेत. T20 मध्ये त्याने 6 अर्धशतकांसह 796 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेटही 125 पेक्षा जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com