Ishan Kishan: जेव्हा खुद्द ब्रायन लाराचा आलेला मेसेज, तेव्हा काय होती इशानची अवस्था, स्वत:च केला खुलासा

Video: इशान किशनने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ब्रायन लारा यांचा मेसेज आला होता, तेव्हाची खास आठवण सांगितली आहे.
Shubman Gill, Brian Lara, Ishan Kishan
Shubman Gill, Brian Lara, Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan recalled the moment when he received a Instagram message from Brian Lara:

भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (1 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

दरम्यान, तिसरा सामन्यानंतर भारताचे युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आणि इशान किशन यांना ब्रायन लारा यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

विशेष म्हणजे तिसरा सामना त्रिनिदादमधीव ज्या मैदानात झाला त्याचे नाव ब्रायन लारा यांच्या नावावरूनच ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी असे ठेवण्यात आले आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गद फलंदाज म्हणून लारा यांना ओळखले जाते.

दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की लारा यांच्याशी संवाद साधत असताना इशानने त्याला जेव्हा लारा यांनी इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, त्या घटनेचा उल्लेख केला आहे.

Shubman Gill, Brian Lara, Ishan Kishan
Shubman Gill: गिलवर चढला कॅरेबियन फिव्हर! लाईव्ह सामन्यात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

इशानने सांगितले की जेव्हा लारा यांनी स्वत:हून त्याला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, तेव्हा तो त्याच्यासाठी खूप खास क्षण होता. तो क्षण तो कधी विसरू शकत नाही.

तो लारा यांना सांगत होता की 'तुम्हाला माहित आहे का एकदा तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. तेव्हा मी खरंच चकीत झालेलो की तुम्ही मला मेसेज कसा काय केला. क्रिकेटमधील इतक्या मोठ्या दिग्गजाने मला मेसेज केला, त्यामुळे मी खूश होतो.'

तसेच इशानने लारा यांच्याशी बोलताना असेही म्हटले की 'माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी त्या आहेत, ज्या कहाण्या मी ऐकल्या आहेत. मी ऐकले आहे की तुम्ही नेहमी लंचपर्यंत फलंदाजी करायचे आणि जर तुम्ही खेळपट्टीवर नसायचा तेव्हा सरावाला जायचा आणि मग परत फलंदाजी करण्यासाठी यायचा. ही गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे.'

Shubman Gill, Brian Lara, Ishan Kishan
Ishan Kishan: इशान किशन ठरला मालिकावीर, पण भारतीय टीम मॅनेजमेंटची वाढली डोकेदुखी

स्टेडियममध्ये खेळण्याच्या अनुभवाबद्दल लारा यांनी इशानला विचारले, तेव्हा तो म्हणाला, 'जिथे तुमच्या नावाचा बोर्ड आहे, तिथे कामगिरी करणे माझ्यासाठी खास आहे. तुम्हाला माहित आहे, मला हायलाईट्स बघायला आवडतात आणि मी तुमची खेळी पाहिली आहे, तुम्ही कसे खेळता आणि शॉट्स कसे मारता. खरं सांगू तर मला या ठिकाणी खेळून खूप आनंद झाला.'

शुभमन गिलने सांगितले की लारा यांच्यामुळे त्याला प्रेरणा मिळते. तो म्हणाला, 'तुमच्याबद्दल माझ्या सगळ्या आठवणी गोलंदाजांविरुद्ध शॉट्स खेळण्याच्या आणि त्यांना निशाणा बनवण्याच्या आहेत. विशेषत: लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये.'

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत गिल आणि इशान या दोघांनीही 143 धावांची सलामी भागीदारी करताना अर्धशतके केली होती. गिलने 85 धावांची खेळी केली होती, तसेच इशानने 77 धावा केल्या होत्या. तसेच इशानचे हे या वनडे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक होते. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com