IRE vs IND, 3rd T20I: बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंडला देणार व्हाईटवॉश? अशी असेल संभाव्य 'प्लेइंग-11'

Ireland vs India: भारत आणि आयर्लंड संघातील तिसरा आणि अखेरचा टी20 सामना बुधवारी खेळवला जाणार असून कुठे आणि केव्हा होणार, जाणून घ्या
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland vs India, 3rd T20I, Probable Playing XI and Live Streaming Details:

भारत विरुद्ध आयर्लंड संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२३ ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. हा सामना मलाहाईड, डब्लिन येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत विजयी आघाडीवर आहे. याचमुळे भारताला या मालिकेत आता आयर्लंडला व्हाईटवॉश देण्याची संधी असणार आहे.

जर भारताने तिसरा सामना जिंकला, तर भारतीय संघ या मालिकेच ३-० असा विजय मिळवेल. पण आयर्लंडही प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.

Team India
IRE vs IND, 2nd T20I: शेवटच्या 12 चेंडूत तब्बल 42 धावा; रिंकूने पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात उमटवला ठसा

कुठे पाहाणार सामना?

या सामन्याचे भारतात स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, तर जिओ सिनेमा ऍपवर सामना ऑनलाईन पाहाता येणार आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघाने यापूर्वीच मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात बेंच स्ट्रेंथ आजमावू शकते. या सामन्यात जितेश शर्मा, शाहबाज अहमद आणि मुकेश कुमार यांना संधी मिळू शकते.

जितेश यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे संजू सॅमसनला विश्रांती देऊन त्याला खेळवले जाऊ शकते. किंवा तिलक वर्मालाही आगामी आशिया चषक स्पर्धेचा विचार करता विश्रांती दिली जाऊ शकते आणि संजू सॅमसन व जितेश दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाऊ शकते.

तसेच आर्शदीप सिंगच्या जागेवर मुकेश कुमारला खेळवले जाऊ शकते, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर शाहबाद अहमदला खेळवले जाऊ शकते. बाकी बदल होण्याची शक्यता कमी आहे.

Team India
IRE vs IND, 2nd T20I: 4,4,4,0,6... संजू सॅमसनने दाखवला दम, तर ऋतुराजने झळकावली शानदार फिफ्टी, पाहा Video

आयर्लंडही अखेरचा सामना असल्याने पहिल्या दोन सामन्यात बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतात. रॉस अडायर, थिओ वॅन वोरकॉम आणि गॅरेथ डेलेनी यांपैकी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा /जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर / शाहबाद अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), आर्शदीप सिंग /मुकेश कुमार

  • आयर्लंड - रॉस अडायर, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​थियो वॅन वोरकॉम, बेंजामिन व्हाइट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com