IRE vs IND, 2nd T20I: शेवटच्या 12 चेंडूत तब्बल 42 धावा; रिंकूने पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात उमटवला ठसा

Rinku Singh Batting: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रिंकू सिंगने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
Rinku Singh
Rinku SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland vs India, 2nd T20I Rinku Singh attacking batting:

आयर्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी (20 ऑगस्ट) टी20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिनला खेळला जात आहे. या सामन्यात रिंकू सिंगला फलंदाजीची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत त्याची छाप सोडली.

या सामन्यात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. पण नंतर चांगली फटकेबाजी केली. त्याने अखेरच्या दोन षटकात काही आक्रमक शॉट्स खेळले.

मात्र, तो अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच खेळी ठरली.

Rinku Singh
Rinku Singh: 'तेव्हा आईने उधारीवर पैसे घेतले, मी आता...', टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर रिंकू झाला व्यक्त

रिंकूने 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले होते. मात्र त्याला त्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच गोलंदाजीचीही संधी मिळाली नव्हती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीसाठी संधी मिळाली आणि त्याने ती दोन्ही हातांनी झेलली देखील.

रिंकूने ही खेळी करताना शिवम दुबेबरोबर 5 व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकात 5 बाद 185 धावांपर्यंत पोहचला. दुबे 16 चेंडूत 2 षटकारांसह 22 धावांवर नाबाद राहिला. 

Rinku Singh
Deepak Chahar - Shivam Dube : 'पुढच्या वर्षी तुझ्यात अन् माझ्यात...', दीपक चाहरचं शिवम दुबेला ओपन चॅलेंज

रिंकू आणि शिवम या दोघांनी मिळून अखेरच्या दोन षटकात 38 धावा फटकावल्या, तसेच या अखेरच्या दोन षटकात 3 वाईड आणि एक बाईज अशा मिळून अतिरिक्त 4 धावाही मिळाल्या. त्यामुळे अखेरच्या दोन षटकात एकूण 42 धावा निघाल्या.

त्याआधी भारताकडून उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली होती. ऋतुराजने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावांची खेळी केली. तसेच सॅमसनने 26 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 40 धावा केल्या.

आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क एडेयर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईच यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com