IRE vs IND, 2nd T20I: 4,4,4,0,6... संजू सॅमसनने दाखवला दम, तर ऋतुराजने झळकावली शानदार फिफ्टी, पाहा Video

Ruturaj Gaikwad - Sanju Samson: आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारताकडून संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडने चांगली फटकेबाजी केली.
Ruturaj Gaikwad and Sanju Samson
Ruturaj Gaikwad and Sanju SamsonDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland vs India, 2nd T20I Ruturaj Gaikwad slams Fifty and Sanju Samson attacking Batting:

आयर्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिनला खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडने चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने आयर्लंडसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले.

डब्लिनमधील द व्हिलेज मैदानावर होत असलेल्या या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

Ruturaj Gaikwad and Sanju Samson
Jasprit Bumrah Record: कॅप्टन बुमराहचा कमबॅकमध्येच जलवा! आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम केला नावावर

मात्र भारताने सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला तिलक वर्मा यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर सलामीला फलंदाजीला आलेला उपकर्णधार ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनने चांगली साथ दिली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबरच काही आक्रमक शॉट्सही खेळले.

डावाच्या 11 व्या षटकात तर सॅमसनने 18 धावा फटकावल्या. आयर्लंडकडून 11 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या जोशुआ लिटिलविरुद्ध सॅमसनने पहिल्या तीन चेंडूंवर तीन चौकार ठोकले. तसेच चौथ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही, पण पाचव्या चेंडूवर सॅमसनने पुन्हा षटकार ठोकला. त्यानंतर सहावा चेंडूही निर्धाव ठरला. त्यामुळे या षटकात एकूण १८ धावा निघाल्या.

Ruturaj Gaikwad and Sanju Samson
Ruturaj Gaikwad: 'सुवर्णपदक जिंकून पोडियमवर...', भारताचा कॅप्टन झालल्या ऋतुराजने फुंकले रणशिंग

मात्र, सॅमसन खेळपट्टीवर चांगला स्थिरावल्यानंतर 13 व्या षटकात बेंजामिन व्हाईटविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 40 धावा केल्या. त्याने ऋतुराजबरोबर 71 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, ऋतुराजनेही या भागीदारीदरम्यान शानदार खेळ केला. त्याने या सामन्यात 39 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक आहे. पण, अर्धशतकानंतर तो काही वेळातच बाद झाला. त्याला बॅरी मॅककार्थीने बाद केले. ऋतुराजने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर रिंकू सिंग आणि शिवम दुबेने डाव सांभाळला. यावेळी एका बाजूने रिंकू आक्रमक खेळताना दिसला, तर दुबेने संयमी फलंदाजी केली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली.

रिंकू अखेरच्या षटकात मार्क एडेयरविरुद्ध मोठा फटका मारताना क्रेग यंगच्या हातून झेलबाद झाला. रिंकूने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. तसेच शिवम दुबे 16 चेंडूत 2 षटकारांसह 22 धावांवर नाबाद राहिला. भारताने 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com