Rinku Singh: बेताची परिस्थिती, डोक्यावर कर्ज, BCCI कडून निलंबन... पण संकटांवर मात करत मिळवली नवी ओळख

रिंकू सिंगसाठी वडिलांची नाराजी पत्करत क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा प्रवास सोपा नव्हता...
Rinku Singh
Rinku SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Rinku Singh Story: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा 3 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केकेआरला अखेरच्या पाच षटकात 28 धावांची गरज असताना रिंकू सिंगने सलग 5 षटकार ठोकले आणि केकेआरला विजय मिळवून दिला. रिंकूने नाबाद 48 धावांची खेळी केली.

या खेळीनंतर रिंकू रातोरात स्टार झाला. पण त्याच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. 12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये जन्म झालेल्या रिंकूच्या घरची परिस्थितीत फारशी चांगली नव्हती. वडील सिंलेंडर घरोघरी पोहोचवण्याचे काम करायचे. घरात रिंकूसह एकूण पाच भावंड. रिंकूचा या पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांक.

त्याच्या वडिलाबरोबरच त्याची भावंडही घराची अर्थिक परिस्थितीत सुधारण्यासाठी काम करत होते. त्यावेळी कुटुंबावर 5 लाखांचे कर्जही होते. पण रिंकूला क्रिकेटची मोठी आवड होती. त्याने क्रिकेटच्या आवडीसाठी 9वी नंतर शिक्षणही सोडले होते. मात्र, त्याच्या वडिलांना त्याचे क्रिकेट खेळणे मान्य नव्हते. त्यांची इच्छा होती त्याने काम करून त्यांना हातभार लावावा. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे.

Rinku Singh
एकिकडे आनंद, दुसरीकडे निराशा! हॅट्रिक, सलग 5 सिक्स... नाट्यमय GT vs KKR सामन्याचा पाहा अखेरचा क्षण

त्याने सांगितले की 'माझ्या वडिलांची इच्छा नव्हती की मी क्रिकेट खेळावे, माझा वेळ यात वाया घालवावा. हट्टामुळे मी कधीकधी मारही खाल्ला आहे. पण माझ्या भावांनी माझी साथ दिली. त्यांनी मला क्रिकेट खेळत राहण्यास सांगितले. काही लोकांनी मला मदतही केली. मला एका कोचिंग सेंटरमध्ये काम मिळाले होते. त्यावेळी तेथील लोकांनी सांगितले होते की सकाळी येऊन फरशी पुसून जात जा. माझ्या भावाने मला ही नोकरी मिळवून दिली होती. पण मी ही नोकरी करू शकलो नाही आणि मी नोकरी सोडून दिली. त्यावेळी वाटले की मी शिकूही शकत नव्हतो, तर पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करायला हवे. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.'

दरम्यान, रिंकूने उत्तर प्रदेशच्या 16, 19 आणि 23 वर्षांखालील संघातही निवड होत गेली. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये वरिष्ठ उत्तर प्रदेश संघातही स्थान मिळवले. त्यात तो चांगली कामगिरी करत होता. 2017 साली आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला संघात घेतले. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्यानंतर 2018 साली त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 80 लाखात संघात घेतलं. त्यावर्षी त्याला 4 सामने खेळण्याची संधीही मिळाली. त्याच्या पुढच्या वर्षासाठीही त्याला संघात कायम केले. मात्र त्याच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. मात्र 2018-19 च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याची बॅट चांगलीच बरसली. त्याने 10 डावात 953 धावा केल्या. त्याने चार शतकं ठोकली. त्याला भारताच्या अ संघातही जागा मिळाली होती.

पण 2019 दरम्यान, त्याच्याकडून एक चूक झाली. त्याने बीसीसीआयची परवानगी न घेता अबुधाबीमध्ये एक टी20 स्पर्धा खेळली. यामुळे बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले. बीसीसीआयच्या नियमानुसार बीसीसीआयच्या अंतर्गत असलेले भारतीय खेळाडू परदेशातील क्रिकेट लीग परवानगीशिवाय खेळू शकत नाहीत. त्यामुळे त्याला तीन महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले. यादरम्यान, त्याला भारताच्या अ संघातील जागाही गमवावी लागली.

Rinku Singh
IPL 2023: शेवटचे 5 बॉल अन् रिंकूचे 5 सिक्स! KKR ने हिसकावला GTचा विजयाचा घास, राशिदची हॅट्रिक व्यर्थ

पण, या सगळ्या गोष्टींवर रिंकूने मात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी तो करत राहिला. त्याला 2023 आयपीएल लिलावात कोलकाताने ५५ लाखांची बोली लावत संघात घेतले.आता त्यानेही त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने आयपीएलमध्ये गेल्यावर्षीही चांगली कामगिरी केली होती.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्येच नाही, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही रिंकूची कामगिरी चांगली झाली आहे. त्याने 2016 साली उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यामध्ये 59.89 च्या सरासरीने 7 शतके आणि 19 अर्धशतकांसह 2875 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने 2014 मध्येच उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने लिस्ट ए क्रिकेट प्रकारात 50 सामने खेळले असून 53 च्या सरासरीने 1 शतक आणि 16 अर्धशतकांसह 1749 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कारकिर्दीत 78 टी20 सामने खेळले असून 1392 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याच्या 20 आयपीएल सामन्यांचाही समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये 349 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com