King’s Cup 2023: वादग्रस्त निर्णय, बरोबरी अन् भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव, इराक फायनलमध्ये

Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला रोमांचक झालेल्या किंग्स कपच्या सेमीफायनलमध्ये इराककडून पराभवाचा सामना करावा लागला.
Indian Football Team
Indian Football TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Iraq enter King’s Cup 2023 Final after Beat India in shootouts 5-4:

थायलंडच्या चियांग माई येथे खेळवण्यात येत असलेल्या किंग्स कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अखेरपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात भारताला इराकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. इराकने पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशा गोल फरकाने भारताला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.

हा सामना भारताला जिंकण्याची संधी होती. मात्र सामना संपण्यासाठी ११ मिनिटाचा वेळ असताना इराकला वादग्रस्तरित्या पेनल्टी मिळाली, ज्यानंतर सामन्याला मोठे वळण मिळाले. भारतीय संघाने 79 व्या मिनिटापर्यंत 2-1 अशी आघाडी राखली होतील.

मात्र, 79 व्या मिनिटावेळी इराकच्या अयमन गादबला पेनल्टी बॉक्समध्ये रोखण्याचा भारताच्या दोन खेळाडूंकडून प्रयत्न झाला. पण पेनल्टी देण्यासाठी हा फाऊल मोठा होता का, याबद्दल भारतीय खेळाडूंनी पंचांना विचारणाही केली.

Indian Football Team
India Football Team: छेत्रीच्या टीम इंडियाला मिळणार 'एवढ्या' कोटीचे बक्षीस, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, या पेनल्टीचा फायदा घेत इराकने गोल करत 2-2 अशी बरोबरी साधली. इराककडून येमेन हुसेनने हा गोल केला. ही बरोबरी भरपाई वेळेतही कायम राहिली.त्यामुळे हा सामना पेनल्टी शूट आऊटमध्ये गेला होता.

या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताकडून 17 व्या मिनिटाला महेश सिंगने गोलचे खाते उघडले. त्याने भारकाकडून पहिला गोल नोंदवला. पण भारताची ही आघाडी खूप वेळ टिकू शकली नाही.

कारण इराकच्या अली-हल-हमदीने लगेचच 28 व्या मिनिटाला इराकसाठी पहिला गोल केला. त्याने पेनल्टीवर हा गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिला हाफ संपला, तेव्हा या सामन्यात 1-1 अशी बरोबरी राहिली.

Indian Football Team
India football team: भारतीय फुटबॉल संघ चीनमध्ये खेळणार! एशियन गेम्समधील सहभागावर शिक्कामोर्तब

दुसऱ्या हाफमध्ये इराकला एक चूक भोवली होती. सामन्याच्या 51 व्या मिनिटाला इराकच्या जलाल हसनने स्वंयगोल केल्याने भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. नंतर दुसरा गोलही इराकने पेनल्टीवर केला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून संदेश झिंगन, सुरेश सिंग, अनिला अली आणि रहिम अली यांनी अचूक निशाणा साधद गोल नोंदवले. मात्र, ब्रँडन फ्रर्नांडिसला संधी साधता आली नाही. त्याला गोल करता आला नाही.

इराककडून मर्चास डोस्की, अली अदनान, अली हुसेन, अमीन हमावी आणि बशर रेसान यांनी अचूक नेम साधत गोल नोंदवले आणि इराकला विजय मिळवून दिला.

13 वर्षांनी सामना

दरम्यान भारत आणि इराक हे 13 वर्षांनंतर आमने-सामने आले होते. त्यांच्यात यापूर्वी 2010 साली सामना झाला होता. त्यावेळी इराकने 2-0 असा विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com