IPL Playoff Equation: आयपीएलमध्ये नवा ट्विस्ट! राजस्थानचा रस्ता खडतर; पंजाब किंग्ज आणि केकेआरच्या प्लेऑफच्या आशा 'मुंबई'च्या हाती

IPL playoff qualification scenarios: आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या ६८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला.
IPL Playoff Equation
IPL Playoff EquationDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या ६८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला. लखनऊचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने या पराभवामुळे त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र, या निकालाचा सर्वात मोठा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसला आहे.

दिल्लीच्या आशा जिवंत राहण्यासाठी पंजाबचा पराभव आवश्यक होता, परंतु पंजाबने विजय मिळवल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अधिकृतपणे भंगले आहे. दिल्ली बाहेर पडल्यानंतर आता प्लेऑफच्या शेवटच्या एका जागेसाठी राजस्थान रॉयल्स (RR), कोलकाता नाइट राइडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

IPL Playoff Equation
Goa Politics: 'आरजीपी'च्‍या गटसमित्‍या बरखास्‍त; मनोज परब पडले उघडे! वीरेश बोरकर सोमवारी सोडणार मौनव्रत,भूमिकेकडे राज्‍याचे लक्ष

राजस्थान रॉयल्स: विजय अन् थेट प्रवेश

राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचे समीकरण अत्यंत साधे आणि सरळ आहे. त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्धचा आपला आगामी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. जर राजस्थानने हा सामना जिंकला, तर इतर सर्व समीकरणांना पूर्णविराम मिळेल आणि ते १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

कारण पंजाब कमाल १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि कोलकाता देखील आपला सामना जिंकल्यास १५ गुणांवरच थांबेल. परंतु, जर राजस्थानचा संघ मुंबईकडून पराभूत झाला, तर ते स्वतःच्याच हाताने आपले नुकसान करून घेतील आणि स्पर्धेतून बाहेर पडतील.

कोलकाता नाइट राइडर्स: मोठ्या फरकाने विजयाची गरज

राजस्थान रॉयल्सचा पराभव झाल्यास कोलकाता नाइट राइडर्ससाठी प्लेऑफची कवाडे उघडू शकतात. मात्र, केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर त्यांना आपला नेट रनरेट प्रचंड सुधारावा लागेल.

जर केकेआरने दिल्लीविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करत २०० धावा केल्या, तर त्यांना कमीत कमी ७७ धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना १८० हून अधिक धावांचे आव्हान अवघ्या १२ ते १२.४ षटकांत पार करावे लागेल. त्यामुळे केकेआरला प्लेऑफ गाठण्यासाठी 'करो या मरो'च्या स्थितीत चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.

IPL Playoff Equation
Goa Politics: 'आरजीपी'च्‍या गटसमित्‍या बरखास्‍त; मनोज परब पडले उघडे! वीरेश बोरकर सोमवारी सोडणार मौनव्रत,भूमिकेकडे राज्‍याचे लक्ष

लखनऊला हरवल्यानंतर पंजाब किंग्सचे समीकरण आता पूर्णपणे दुसऱ्यांच्या सामन्यांवर अवलंबून आहे. पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि केकेआर या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने गमावणे आवश्यक आहे. त्यातही राजस्थानचा पराभव पंजाबसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जर राजस्थान हरले आणि केकेआरने आपला सामना अगदी कमी फरकाने जिंकला, तर सरस रनरेटच्या जोरावर पंजाब किंग्स थेट प्लेऑफमध्ये धडक मारेल. मात्र, केकेआरने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर मात्र पंजाबचे आव्हान संपुष्टात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com