'IPL'चा रुबाबच वेगळा! खेळाडूंनंतर कॉमेंटेटर्सनीही 'PSL'ला दाखवला 'ठेंगा', धरली भारताची वाट

Commentator Nick Knight Choose IPL over PSL: जागतिक क्रिकेटमध्ये सध्या दोन मोठ्या टी-२० लीगच्या तारखांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.
Commentator Nick Knight Choose IPL over PSL
Commentator Nick Knight Choose IPL over PSLDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या दोन मोठ्या टी-२० लीगच्या तारखांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) २०२६ आणि दुसरीकडे क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत मानली जाणारी 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) २०२६ या दोन्ही स्पर्धांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात ओवरलॅपिंग होत आहे. याचा थेट परिणाम खेळाडूंसोबतच आता कॉमेंटेटर्सच्या उपस्थितीवरही झाला आहे. अनेक नामवंत खेळाडूंनी आयपीएलसाठी पीएसएल सोडल्यानंतर आता दिग्गज कॉमेंटेटर्सनीही आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे.

निक नाईट यांचा ऐनवेळी निर्णय

या प्रकरणातील सर्वात मोठे नाव म्हणजे इंग्लंडचे माजी सलामीवीर निक नाईट. निक नाईट यांचे नाव आधी पीएसएल २०२६ च्या अधिकृत ब्रॉडकास्टर्सच्या यादीत जाहीर करण्यात आले होते. मात्र, पीएसएल सुरू होण्याला अवघे काही तास उरले असतानाच त्यांचे नाव आयपीएल २०२६ च्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये समाविष्ट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते आता पीएसएलमधील वसीम अक्रम आणि रमीझ राजा यांच्या सोबतची साथ सोडून आयपीएलमध्ये रवी शास्त्री आणि हर्षा भोगले यांच्या टीममध्ये सामील होणार आहेत.

Commentator Nick Knight Choose IPL over PSL
Goa Murder Case: गोवा फिरायला आला अन्... कळंगुटमध्ये पर्यटकाची चाकूने भोसकून हत्या, कॅसिनोचा वाद विकोपाला

खेळाडूंनीही दाखवला पीएसएलला 'ठेंगा'

केवळ कॉमेंटेटर्सच नव्हे, तर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही आयपीएलला प्राधान्य दिले आहे. यात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी याने इस्लामाबाद युनायटेड ऐवजी कोलकाता नाईट रायडर्सला पसंती दिली आहे. श्रीलंकेचा दासुन शनाका लाहोर कलंदर्स सोडून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे, तर ऑस्ट्रेलियाचा स्पेंसर जॉन्सन आता चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दिसणार आहे. आयपीएलमधील काही खेळाडू जखमी झाल्यामुळे या खेळाडूंना संधी मिळाली असून, त्यांनी कॅश-रिच लीग असलेल्या आयपीएलला पसंती दिली आहे.

Commentator Nick Knight Choose IPL over PSL
Goa Crime: आई शॉपिंगमध्ये व्यस्त, अन् तिथेच नराधमाने साधली संधी; मडगावात दोन चिमुरड्यांचा लैंगिक छळ, फोंड्यातील एकाला अटक

आयपीएलचे तगडे कॉमेंट्री पॅनल

आयपीएल २०२६ साठी दोन मोठ्या ब्रॉडकास्टर्सनी दिग्गज खेळाडूंची फौज तयार केली आहे. जिओ हॉटस्टारच्या हिंदी पॅनेलमध्ये आर अश्विन, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांसारखे स्टार्स आहेत, तर स्टार स्पोर्ट्सच्या पॅनेलमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील गावस्कर यांची जादू पाहायला मिळणार आहे. इंग्रजी पॅनेलमध्ये एबी डिव्हिलियर्स, केविन पीटरसन आणि निक नाईट यांसारख्या दिग्गजांचा समावेश असल्याने यंदाची आयपीएल अधिकच रंगतदार होणार हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com