Rohit Sharma: केवळ 28 धावांवर बाद झाला, पण हिटमॅन 'हा' विक्रम करत विराट-धवनच्या पंक्तीत सामील

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma complete 6000 runs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. या दोघांनीही चांगली सुरुवात केली होती. ते जवळपास 10 च्या धावगतीने खेळत होते.

त्यांच्यात भागीदारी सुरू असताना तिसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रोहितने वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध चौकार मारला. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत.

Rohit Sharma
IPL 2023: हर्षल पटेलला अम्पायरने ओव्हर पूर्ण करु दिली नाही? काय आहे नियम जाणून घ्या

मात्र, रोहित त्यानंतर लगेचच 5 व्या षटकात टी नटराजनविरुद्ध खेळताना एडन मार्करमकडे झेल देत बाद झाला. त्याने 18 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याच्या नावावर आता आयपीएलमध्ये 232 सामन्यांमध्ये 30.22 च्या सरासरीने 6014 धावांची नोंद झाली आहे. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित विराट-धवनच्या यादीत सामील

दरम्यान, रोहित आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा चौथाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या तिघांनी केला आहे. आयपीएलमध्ये सध्या सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर असून त्याने 228 सामन्यांमध्ये 6844 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ शिखर धवन असून त्याने 210 सामन्यात 6477 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 167 सामन्यांमध्ये 6109 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma
IPL 2023: RCB च्या होम ग्राऊंडवर धोनीच्या CSK चा रोमांचक विजय! मॅक्सवेल-डुप्लेसिसच्या झंझावाती खेळीवर फेरले पाणी

मुंबईच्या 192 धावा

मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर कॅमेरॉन ग्रीनने ईशान किशनला चांगली साथ दिली होती. पण 12 व्या षटकात चांगला खेळ करणाऱ्या ईशानला 38 धावांवर मार्को यान्सिनने एडेन मार्करमच्या हातून झेलबाद केले. याच षटकात सूर्यकुमारही 7 धावा करून बाद झाला.

पण त्यानंतर तिलक वर्माने ग्रीनला चांगली साथ देताना अर्धशतकी भागीदारी केली. पण 17 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने तिलकला 37 धावांवर बाद केले. त्यांनतर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडनेही ग्रीनला चांगली साथ दिली. ग्रीनने आक्रमक फटके खेळताना त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र डावाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड 16 धावांवर धावबाद झाला. पण ग्रीन 40 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या.

हैदराबादकडून मार्को यान्सिनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com