IPL 2023 Video: एका ओव्हरमध्ये 5 चौकार अन् 25 चेंडूत फिफ्टी! जयस्वालची DC विरुद्ध तोडफोड बॅटिंग

शनिवारी आयपीएल 2023 च्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak
Published on
Updated on

Yashasvi Jaiswal Batting: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 11 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली.

गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण राजस्थानकडून जोस बटलरबरोबर सलामीला फलंदाजीला उतरलेल्या जयस्वालने आक्रमक सुरुवात केली.

त्याने खलील अहमदने गोलंदाजी केलेल्या पहिल्याच षटकात पाच चौकार ठोकले. त्यानंतरही त्याने त्याचा आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. तो आक्रमक खेळत असताना दुसरी बाजू जोस बटलरने सांभाळली होती. या दोघांनी मिळून पहिल्या पाच षटकातच 60 धावांचा टप्पा ओलांडला होता.

Yashasvi Jaiswal
IPL 2023: वयाच्या चाळीशीतही अमित मिश्राची कमालीची फिल्डिंग, सूर मारत पकडला अफलातून कॅच, पाहा Video

दरम्यान, जयस्वालने आक्रमक खेळ करताना 25 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो 9 व्या षटकात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. जयस्वालने 31 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावांची खेळी केली.

त्याने बटलरसह सलामीला 98 धावांची भागीदारी केली. दरम्यान, त्याच्या खेळीदरम्यानचे काही शॉट्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जयस्वालचे हे आयपीएलमधील पाचवे अर्धशतक आहे.

Yashasvi Jaiswal
IPL 2023: 'ऑलराऊंडर' कृणाल पंड्या हार्दिक, रोहित, जडेजाच्या पंक्तीत सामील

तो बाद झाल्यानंतर राजस्थानने कर्णधार संजू सॅमसन (0) आणि रियान पराग (7) स्वस्तात बाद झाले. पण नंतर बटलरला शिमरॉन हेटमायरही साथ मिळाली. त्यांनी डाव पुढे नेला. दरम्यान, बटलरनेही अर्धशतक पूर्ण केले. पण त्यालाही मुकेश कुमारनेच 19 व्या षटकात बाद केले. बटलरने 51 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 79 धावांची खेळी केली.

अखेरीस हेटमायरने काही चांगले शॉट्स खेळले, त्याला ध्रुव जुरेलने साथ दिली. त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या. हेटमायर 21 चेंडूत 39 धावांवर नाबाद राहिला, तसेच जुरेल 3 चेंडूत 8 धावांवर नाबाद राहिला.

दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन विकेट्स घेतल्या. तसेच रोवमन पॉवेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com