Pranali Kodre
आयपीएल 2023 मध्ये 7 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात लखनऊकडून कृणाल पंड्याने शानदार अष्टपैलू कामगिरी करताना 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या, तसेच फलंदाजी करताना त्याने 34 धावांची महत्त्वाची खेळी केली होती.
त्यामुळे कृणाल आयपीएल सामन्यात 5 पेक्षा कमीची इकोनॉमी ठेवत 3 विकेट्स आणि 30+ धावा करणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
असा विक्रम सर्वात आधी रोहित शर्माने केला होता. रोहितने 2009 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
या यादीत सर्वाधिकवेळी रविंद्र जडेजाचे नाव येते. जडेजाने तीन वेळा आयपीएल सामन्यात 5 पेक्षा कमीची इकोनॉमी ठेवत 3 विकेट्स आणि 30+ धावा करण्याचा विक्रम केला आहे.
जडेजाने 2012 साली डेक्कन चार्जर्सविरुद्ध, 2013 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि 2021 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अशा अष्टपैलू कामगिरी केली आहे.
याशिवाय अमित मिश्राने 2013 साली पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध कामगिरी केली होती.
अक्षर पटेलने 2017 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 5 पेक्षा कमीची इकोनॉमी ठेवत 3 विकेट्स आणि 30+ धावा करण्याचा विक्रम केला होता.
कृणालचा धाकटा भाऊ हार्दिक पंड्याही या विक्रमाच्या यादीत असून त्याने 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.