IPL 2023: DC चे मार्श, शॉ, सर्फराज बाहेर, RR कडून बटलर खेळणार! जाणून घ्या Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धत 11 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे.
RR vs DC
RR vs DCDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan Royals vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 11 वा सामना आज (8 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. हा सामना राजस्थानचे घरचे मैदान असलेल्या गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील तिसरा सामना आहे. दिल्लीने यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारला आहे, तर राजस्थानने पहिला सामना जिंकला आहे आणि दुसरा सामना पराभूत झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून दोन्ही संघ विजयी मार्गवर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

RR vs DC
IPL 2023: वयाच्या चाळीशीतही अमित मिश्राची कमालीची फिल्डिंग, सूर मारत पकडला अफलातून कॅच, पाहा Video

आजच्या सामन्यासाठी दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले आहेत. मिचेल मार्श त्याच्या लग्नासाठी मायदेशी परतला असल्याने तो संघातून बाहेर गेला आहे. तसेच सर्फराज खान आणि पृथ्वी शॉ हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहेत. तसेच रोवमन पॉवेल, ललित यादव आणि मनिष पांडे यांना प्लेइंग इलेव्हन संघात संधी मिळाली आहे.

राजस्थान संघात जोस बटलर कायम आहे. त्याला मागच्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते, पण तो बरा असल्याचे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने माहिती दिली आहे. त्यामुळे बटलर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे.

RR vs DC
IPL 2023: मुंबई-चेन्नईला मोठा धक्का! दोन्ही संघाचे स्टार खेळाडू आजच्या मॅचमधून बाहेर?

दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरव्यतिरिक्त रिली रोसौ, एन्रिच नॉर्किया आणि रोवमन पॉवेल हे परदेशी चार खेळाडू आहेत. तसेच राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बटलरसह, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट हे चार परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूचाच सामन्यात समावेश करता येणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिली रोसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), एन्रिच नॉर्किया, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार

  • राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com