Shreyas Iyer: सर्जरी नक्की? IPL ला तर मुकणारच, पण 'ही' ICC स्पर्धा खेळणेही कठीण

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerDainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer is likely to have surgery: मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामनाही खेळायचा आहे. मात्र आता या स्पर्धांना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर मुकण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याचमुळे त्याला या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तो या शस्त्रक्रियेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली भारतात किंवा लंडनमध्ये शस्त्रक्रिया करू शकतो.

Shreyas Iyer
Shreyas Iyer श्रेष्ठाबरोबर थिरकला Tum-Tum गाण्यावर! पाहा भावा-बहिणीचा भन्नाट डान्स

श्रेयसला जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळताना श्रेयसला पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने साधारण एक महिन्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन केले होते.

तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळला. तसेच चौथ्या कसोटीसाठीही त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले होते. पण चौथ्या सामन्यादरम्यानच त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतूनही बाहेर व्हावे लागले.

आता त्याला शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांकडून सल्ला मिळाला असल्याचे समोर आले आहे. जर आता ही शस्त्रक्रिया झाली तर मात्र श्रेयलसा कमीत कमी पाच महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

असे असल्यास त्याला आता आगामी आयपीएल स्पर्धेला आणि त्यानंतर 7 जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तो केकेआरचा कर्णधार आहे. त्यामुळे जर आता तो आयपीएलमधून बाहेर झाला, तर केकेआरला कर्णधारपदासाठी नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

Shreyas Iyer
Shreyas Iyer: टीम इंडियालाच नाही KKR लाही धक्का? रोहित शर्माने दिले अय्यरबद्दल महत्त्वाचे हेल्थ अपडेट्स

श्रेयस अय्यरची कारकिर्द

श्रेयसने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 कसोटी सामने खेळले असून 16 डावात फलंदाजी करताना 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 666 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 42 वनडे सामने खेळले असून 46.60 च्या सरासरीने 2 शतके आणि 14 अर्धशतकांसह 1631 धावा केल्या आहेत.

त्याने 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 30.67 च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये 101 सामन्यांमध्ये 19 अर्धशतकांसह 2776 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com