Rohit Sharma आऊट की नॉटआऊट? मुंबईच्या कॅप्टनचा DRS वादाच्या भोवऱ्यात, माजी खेळाडूही नाराज

मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची विकेट वादग्रस्त ठरली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Wicket in the midst of controversy: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात मंगळवारी 54 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 21 चेंडू राखून 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. पण असे असले तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची विकेट वादग्रस्त ठरली आहे.

या सामन्यात बेंगलोरने मुंबईसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. ईशानने यावेळी सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याला दुसऱ्या बाजूने रोहितने साथ दिली.

पण या दोघांनाही वनिंदू हसरंगाने पाचव्या षटकात बाद केले. ईशान 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितला तिसऱ्या पंचांकडून बादचा करार देण्यात आला. पण त्याच्या या विकेटमुळे सध्या डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम नियमाची (DRS) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि मुनाफ पटेल यांनीही त्याच्या विकेटवर नाराजी व्यक्त केली आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: अरर! 35 की 36..., हिटमॅन चक्क स्वत:चं वयच विसरला अन्...

झाले असे की वनिंदू हसरंगाने टाकलेला एक चेंडू रोहितच्या पॅडला लागला. त्यावेळी रोहित क्रिजच्या बराच लांब होता. त्यावर बेंगलोरने पायचीतसाठी अपील केले. पण मैदानावरील पंचांनी हे अपील फेटाळले. त्यानंतर बेंगलोरचा संघाने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये रोहितला बाद देण्यात आले. त्यामुळे रोहितला 7 धावा करून माघारी परतावे लागले.

दरम्यान, यानंतर आता चाहत्यांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की रोहित क्रिजपासून इतका दूर असतानाही त्याला पायचीत कसे देण्यात आले. कारण आयपीएलच्या नियमानुसार जेव्हा फलंदाजाच्या पायाला चेंडू लागतो, तेव्हा जर तो स्टंप्सपासून 3 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक दूर असेल, तर त्याला बाद दिले जात नाही.

त्यानुसार ज्यावेळी रोहितच्या पॅडला चेंडू लागला, तेव्हा तो क्रिजच्या खूप दूर दिसत आहे. काही रिपोर्ट्सनुसार रोहित स्टंप्सपासून जवळपास साडेतीन मीटर दूर होता. त्याचमुळे सध्या रोहितच्या डीआरएसवर वाद होताना दिसत आहेत.

दरम्यान, याबद्दल कैफने ट्विट केले आहे की 'हॅलो डीआरएस, हे जरा जास्तच होत नाही का? हा पायचीत कसा असू शकेल?'

Rohit Sharma
Rohit Sharma Birthday: काकांकडे बालपण, कोचमुळे शाळेत मिळाली शिष्यवृत्ती ते भारताचा कर्णधार, वाचा हिटमॅनची स्टोरी

त्याचबरोबर मुनाफ पटेलने ट्विट केले आहे की 'असे वाटते की डीआरएसचाही डीआरएस असायला हवा. अनलकी रोहित शर्मा. पब्लिक काय म्हणतेय, हा आऊट आहे की नाही.'

मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, मुंबईने हा सामना जिंकल्याने आता ते 11 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिस (65) आणि ग्लेन मॅक्सवेल (68) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 199 धावा केल्या होत्या. मुंबईकडून जेसन बेऱ्हेडॉर्फने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मुंबईने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत 200 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले आणि सामना आपल्या नावावर केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. तसेच नेहल वढेराने नाबाद 52 धावांची खेळी केली. बेंगलोरकडून वनिंदू हसरंगा आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com