IPL 2023: तीन विकेट्स घेणारा आंद्रे रसेल बॉलिंग सोडून का गेला मैदानाबाहेर, KKR चं टेंशन वाढणार?

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार ऑलराऊंडर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी मध्येच सोडून मैदानाबाहेर गेला होता.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersDainik Gomantak
Published on
Updated on

Andre Russell Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 23 धावांनी विजय मिळवला. दरम्यान सामन्यात कोलाकाताचे मोठे टेंशन वाढले आहे.

या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्र रसेल दुखापत झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण हा सामना सुरु असताना तो लंगडत मैदानातून बाहेर गेला होता.

खरंतर आंद्रे रसेलने यापूर्वी या हंगामात गोलंदाजी केली नव्हती. पण शुक्रवारी कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने पहिल्यांदाच त्याच्याकडे गोलंदाजी सोपवली. तो प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या पाचव्या षटकात गोलंदाजीला आला.

महत्त्वाचे म्हणजे त्याने पहिल्याच चेंडूवर मयंक अगरवालला 9 धावांवर बाद केले. याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने राहुल त्रिपाठीलाही 9 धावांवर माघारी धाडले.

Kolkata Knight Riders
IPL 2033: 11.50 कोटीच्या धोकादायक लिव्हिंगस्टोनला गुजरातविरुद्ध का खेळवले नाही? धवनने दिले उत्तर

त्यानंतर त्याने 7 व्या षटकातही गोलंदाजी केली. पण या षटकात गोलंदाजी करताना त्याला वेदना झाल्याचे दिसले. पण त्याने या षटकात पूर्ण गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. पण काहीवेळाने तो पुन्हा मैदानात आला.

त्यानंतर त्याला 19 व्या षटकातही गोलंदाजी करण्यासाठी राणाने चेंडू सोपवला. रसेलने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला 32 धाावंवर माघारी धाडले. मात्र, त्यानंतर तो मैदानावर झोपला. त्याला यष्टीरक्षक रेहमनुल्लाह गुरबाजने मदत करण्याचाही प्रयत्न केला.

पण त्याला क्रँम्पच्या वेदनांमुळे काही करता येत नसल्याने तो षटक पूर्ण न करताच केकेआर संघातील सदस्यांच्या मदतीने लंगडत मैदानातून बाहेर गेला. त्याच्या या षटकातील उर्वरित पाच चेंडू शार्दुल ठाकूरने टाकले आणि षटक पूर्ण केले.

Kolkata Knight Riders
IPL 2023: ब्रुकच्या शतकानंतर हैदराबादने रोखला कोलकाताचा विजयी रथ! राणा, रिंकूची अर्धशतकं व्यर्थ

दरम्यान, तो नंतर फलंदाजीसाठी आला होता, पण तो 6 चेंडूत 3 धावाच करू शकला. पण आता त्याला उद्भवलेली ही दुखापत किती गंभीर आहे की केवळ क्रँम्प आहेत, याबद्दल अद्याप केकेआरने कोणतीही माहिती दिलेली नाही.

मात्र, कोलकाताला अपेक्षा असेल की रसेलची दुखापत गंभीर नसावी. कारण यापूर्वीच कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाला आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून हॅरी ब्रुकने नाबाद 100 धावांची खेळी केली, तर कर्णधार एडन मार्करमने 50 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 4 बाद 228 धावा करता आल्या होत्या. कोलकाताकडून आंद्र रसेलने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून कर्णधार नितीश राणाने 75 धावांची खेळी केली, तसेच रिंकू सिंगने 58 धावांची नाबाद खेळी केली. मात्र, त्यांना कोलकाताला विजय मिळवून देता आला नाही. कोलकाताने 20 षटकात 7 बाद 205 धावा केल्या. सनरायझर्स हैदरबादकडून मार्को यान्सिन आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com