IPL 2033: 11.50 कोटीच्या धोकादायक लिव्हिंगस्टोनला गुजरातविरुद्ध का खेळवले नाही? धवनने दिले उत्तर

पंजाब किंग्सने आक्रमक खेळाडू लिव्हिंगस्टोनला गुजरात टायटन्स विरुद्ध न खेळवण्यामागील कारण शिखर धवनने स्पष्ट केले आहे.
Liam Livingstone
Liam LivingstoneDainik Gomantak
Published on
Updated on

Liam Livingstone missed PBKS vs GT Game: गुरुवारीत इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने अखेरच्या षटकात पंजाब किंग्सला 6 विकेट्सने पराभूत केले. दरम्यान, या सामन्यात पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन का खेळला नाही असा प्रश्न अनेकांना पडला. याचे कारण पंजाबचा कर्णधार शिखर धवनने स्पष्ट केले आहे.

लिव्हिंगस्टोन गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण तो गुजरात टायटन्सच्या सामन्यापूर्वी पंजाब संघात तंदुरुस्त होऊन परतला होता. त्याला गेल्यावर्षी पंजाबने 11.50 कोटींच्या किमतीत खरेदी केले होते.

तो आक्रमक फलंदाज असून चांगली फिरकी गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे पंजाबला त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. त्याने गेल्यावर्षीही चांगली कामगिरी करताना 437 धावा केल्या होत्या आणि 6 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्याकडून यावर्षीही पंजाबला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल.

Liam Livingstone
IPL 2023: LIVE मॅचमध्येच हार्दिक पांड्याचा चढला पारा, व्हिडिओ व्हायरल होताच...

त्याचमुळे तो गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान, त्याला पुन्हा दुखापत झाली आहे. शिखरने याबद्दल माहिती दिली आहे.

सामन्यानंतर इयान बिशप यांच्याशी बोलताना शिखरने सांगितले की 'लियाम लिव्हिंगस्टोन सरावाला आला होता. पण त्याच्या स्नायूंमध्ये ताण आला आहे. तो पुढील 3-4 दिवसाच बरा होईल.'

दरम्यान, शिखरने दिलेल्या या माहितीनुसार लिव्हिंगस्टोन लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 15 एप्रिलला होणाऱ्या सामन्यासाठीही पंजाबसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. पण पंजाबला तो लवकरात लवकर बरा होण्याची अपेक्षा असेल.

Liam Livingstone
IPL 2023: विकेटकिपर साहाची चतुराई अन् पंजाबचा फलंदाज बाद, कॅप्टन पंड्याही झाला खूश, पाहा Video

गुजरातचा अखेरच्या षटकात विजय

गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच चार खेळाडू 20 ते 30 धावांदरम्यान धावा करून बाद झाले. मात्र कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे पंजाबला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 153 धावा करता आल्या.

त्यानंतर 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने 19.5 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. गुजरातकडून शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करताना 49 चेंडूत 67 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com