IPL 2023: ईडन गार्डन्सवर KKR ला आव्हान देण्यास SRH सज्ज! पाहा दोन्ही संघाचे Playing XI

आयपीएल 2023 मधील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे.
KKR vs SRH
KKR vs SRHDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 19वा सामना शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जात आहे. हा सामना कोलकाताचे घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे.

सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सामन्यासाठी कोलकाताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. पण प्रथम फलंदाजीला उतरणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला वॉशिंग्टन सुंदरऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

KKR vs SRH
IPL 2033: 11.50 कोटीच्या धोकादायक लिव्हिंगस्टोनला गुजरातविरुद्ध का खेळवले नाही? धवनने दिले उत्तर

कोलकाता संघात रेहमनुल्लाह गुरबाज, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन आणि सुनील नारायण हे चार परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार एडेन मार्करमबरोबरच हॅरी ब्रुक, हेन्रिक क्लासेन आणि मार्को यान्सिन यांना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूलाच खेळवावे लागणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंसाठी सनरायझर्स हैदराबादने अब्दुल सामद, विवरांत शर्मा, मयंक डागर, ग्लेन फिलिप्स आणि वॉशिंग्टन सुंदर यांची नावे दिली आहेत, तर कोलकाताने मनदीप सिंग, अनुकूल रॉय, वेंकटेश अय्यर, डेव्हिड विझे, कुलवंत खेजरोलिया यांची नावे दिली आहेत.

KKR vs SRH
IPL 2023: डू प्लेसिस, सॅमसनपाठोपाठ हार्दिक पंड्यावरही झाली दंडात्मक कारवाई, 'हे' आहे कारण

दरम्यान आज कोलकाता संघ सलग तीन सामने जिंकून हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. तर हैदराबादनेही मागील सामन्यात पंजाबला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यानंतर आता ते विजयाची लय कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • कोलकाता नाईट रायडर्स - रेहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

  • सनरायझर्स हैदराबाद - हॅरी ब्रूक, मयंक अगरवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com