Punjab Kings vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल हार्दिकवर आयपीएलच्या आचारसंहितेनुसार 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल आयपीएलने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.
यामध्ये सांगण्यात आले आहे की 'गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला १३ एप्रिल 2023 रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यादरम्यान त्याच्या संघाने षटकांची गती कमी राखण्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.'
'आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही संघाची या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे पंड्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.'
दरम्यान, आयपीएल 2023 हंगामात षटकांची गती कमी राखल्याबद्दल 12 लाखांचा दंड होणारा पंड्या पहिला कर्णधार नाही. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावरही 12 लाखांची दंडाची कारवाई झाली आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 153 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय चार खेळाडूंनीही 20 धावांचा टप्पा ओलांडला. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करताना 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली. तसेच वृद्धिमान साहाने 30 धावांची खेळी केली. त्यामुळे 19.5 षटकात गुजरातने ४ विकेट्स गमावत 154 धावा करत सामना जिंकला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. गुजरातचा हा या हंगामातील 4 सामन्यांमधील तिसरा विजय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.