KKR vs RCB सामन्यात स्पिनर्सचाच डंका! IPL इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

आयपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघामध्ये झालेल्या सामन्यात फिरकीपटूंनी मोठा कारनामा केला आहे.
KKR vs RCB
KKR vs RCB
Published on
Updated on

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील नववा सामना विक्रमी ठरला आहे. हा सामना ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात गुरुवारी (6 एप्रिल) पार पडला होता. या सामन्यात केकेआरने 81 धावांनी जिंकला.

या सामन्यात केकेआरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाज (57), शार्दुल ठाकूर (68) आणि रिंकू सिंग (46) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 7 बाद 204 धावा केल्या होत्या आणि आरसीबीसमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान ठेवले होते. पण आरसीबीचा डाव 17.4 षटकात 123 धावांवरच संपुष्टात आला.

KKR vs RCB
IPL 2023: मनदीप सिंगने केला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड नावावर, रोहित शर्मालाही टाकले मागे

केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा आणि सुनील नारायण या फिरकी त्रिकुटाने मिळून 9 विकेट्स घेतल्या. तर एक विकेट वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला मिळाली. वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच 19 वर्षीय सुयशने पदार्पण करताना 3 विकेट्स घेतल्या. तसेच नारायणने 2 विकेट्स घेतल्या.

त्यामुळे हा आयपीएलमधील पहिलाच असा सामना ठरला, ज्यामध्ये एका डावात फिरकीपटूंनी 9 विकेट्स घेतल्या. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून तीन वेळा फिरकीपटूंनी एका डावात 8 विकेट्स घेतल्या होत्या.

2019 च्या आयपीएल हंगामात आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यांमध्ये सीएसकेच्या फिरकीपटूंनी 8-8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याआधी 2012 रोजी विशाखापट्टणमला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्येही सीएसकेच्या फिरकीपटूंनी 8 विकेट्स घेतल्या होत्या.

KKR vs RCB
IPL 2023: रोहितच्या मुंबईसेनेत ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज सामील! जखमी रिचर्डसनची घेणार जागा

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात आरसीबीकडून  कर्ण शर्मा आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यातील कर्ण शर्मा आणि ब्रेसवेल हे फिरकीपटू आहेत.

त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या एकूण विकेट्सची संख्या 12 झाली. त्यामुळे एकाच आयपीएल सामन्यात फिरकीपटूंनी 12 विकेट्स घेण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली.

यापूर्वी २०१२ मध्ये कोलकातालाच झालेल्या केकेआर विरुद्ध पंजाब किंग्सच्या सामन्यात 11 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. तसेच 2018 साली देखील कोलकातालाच केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात फिरकीपटूंनी 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर 2019 ला चेन्नईत झालेल्या सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यातही फिरकीपटूंनी 11 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com