IPL 2023: रोहितच्या मुंबईसेनेत ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज सामील! जखमी रिचर्डसनची घेणार जागा

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 हंगामासाठी दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians announced replacement for Jhye Richardson: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या सुरुवातीलाच अनेक संघांप्रमाणे मुंबई इंडियन्सला खेळाडूंच्या दुखापतीचे धक्के बसले आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्सने गुरुवारी (6 एप्रिल) दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 साठी 1.5 कोटी रुपयांमध्ये ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज रिली मेरेडिथला रिचर्डसनचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील करून घेतले आहे.

महत्त्वाचे म्हणजे मेरेडिथ गेल्यावर्षीच्या म्हणजेच आयपीएल 2022 हंगामातही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्याला गेल्यावर्षी 1 कोटीच्या किमतीत मुंबई इंडियन्सने लिलावात खरेदी केले होते. पण आयपीएल 2023 पूर्वी त्याला संघातून मुक्त केले होते. त्याने गेल्यावर्षी मुंबई इंडियन्ससाठी 8 सामने खेळले होते. यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या.

Mumbai Indians
IPL 2023: तुला मानला रे ठाकूर! RCB विरुद्ध ताबडतोड फिफ्टीनंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

त्यापूर्वी मेरेडिथने 2021 साली पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला 2021 आयपीएल हंगामासाठी पंजाबने 8 कोटींची किंमत मोजत संघात घेतले होते.

दरम्यान, मेरेडिथ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज होता. त्याने 14 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या होत्या. मेरेडिथने आत्तापर्यंत कारकिर्दीत 77 टी20 सामने खेळले असून 100 विकेट्स घेतल्या आहेत.

आता तो आयपीएल 2023 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सकडे आता त्याच्याबरोबरच वेगवान गोलंदाजीसाठी जोफ्रा आर्चर, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, ड्युएन यान्सिन आणि कॅमेरॉन ग्रीन असे परदेशी खेळाडूंचे पर्याय आहेत.

Mumbai Indians
IPL 2023: सर्वोत्तम कॅचनेच दिला घाव! संजू सॅमसननं सांगितलं बटलर ऐवजी अश्विनने ओपनिंग करण्याचं कारण

दरम्यान, आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या झाय रिचर्डसनची काही दिवसांपूर्वीच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याला या आयपीएल हंगामाला मुकावे लागले आहे.

मुंबईने यापूर्वीच अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा बदली खेळाडू म्हणून आयपीएल 2023 साठी संदीप वॉरियरची निवड केली आहे. बुमराहची देखील पाठीवर शस्त्रक्रिया झाल्याचे समजले आहे. त्यामुळे तो देखील आयपीएल 2023 मध्ये सहभागी झालेला नाही.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांना पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com