IPL 2023: आयपीएल 2023 साठी सर्व संघ सज्ज आहेत. सीझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात 31 मार्च रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
यंदा जवळपास सर्वच संघ दुखापतींशी झुंजत आहेत. पंजाब किंग्ज संघाने जॉनी बेअरस्टोसारखा धोकादायक फलंदाजही दुखापतीमुळे गमावला.
पण आता त्याने त्याच्या जागी एका धडाकेबाज फलंदाजाचा आपल्या संघात समावेश केला आहे. हा खेळाडू जॉनी बेअरस्टोप्रमाणे टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करु शकतो.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू शॉर्ट आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या सोशल मीडियाच्या मदतीने ही माहिती दिली आहे.
जॉनी बेअरस्टो आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्ड म्हणजेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून एनओसी न मिळाल्यामुळे यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकणार नाही.
गोल्फ कोर्स दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाल्यानंतर या क्रिकेटरने ऑगस्ट 2022 पासून कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही. जरी तो बर्या प्रमाणात बरा झाला आहे.
मात्र यंदा इंग्लंड (England) संघाला अनेक महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत त्याला आगामी काळात तंदुरुस्त ठेवायचे आहे. त्यामुळेच त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
पंजाब किंग्ज संघात सामील झालेल्या मॅथ्यू शॉर्टबद्दल सांगायचे झाल्यास, त्याला अद्याप त्याच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.
यावर्षी खेळल्या गेलेल्या बीबीएलमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
शॉर्टने बीबीएलमध्ये 144.47 च्या स्ट्राइक रेटने 458 धावा केल्या. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली.
शिखर धवन (Shikhar Dhawan) (क), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, बलतेज सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, सॅम करण, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वत कविरप्पा, शिवम सिंग, मोहित राठी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.